TRENDING:

Mumbai Local Clash: लोकलमध्ये राडा, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा डोळा फुटला, ३२ तासांत आरोपी अटकेत

Last Updated:

Mumbai Local Clash: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमधील 'राडे' आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहेत. वांद्रे स्थानकात दोन प्रवाशांच्या वादात तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाला आपली दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमधील 'राडे' आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहेत. वांद्रे स्थानकात दोन प्रवाशांच्या वादात तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाला आपली दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. जागेवरून झालेल्या वादाचा राग अनावर झाल्याने एका प्रवाशाने चालत्या गाडीवर दगड भिरकावला, जो थेट दुसऱ्या प्रवाशाच्या डोळ्याला लागला. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अवघ्या ३२ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
लोकलमध्ये राडा, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा डोळा फुटला, ३२ तासांत आरोपी अटकेत
लोकलमध्ये राडा, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा डोळा फुटला, ३२ तासांत आरोपी अटकेत
advertisement

नेमकी घटना काय?

दादर येथे राहणारे निशांत खत्री हे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री अंधेरीहून दादरला जाण्यासाठी फास्ट लोकलने प्रवास करत होते. रात्री ११ च्या सुमारास गाडी वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर आली. त्याच डब्यात दोन प्रवाशांमध्ये जागेवरून जोरदार भांडण सुरू होते. गाडी स्थानकात थांबली असताना, भांडण करणाऱ्यांपैकी एक प्रवासी रागाच्या भरात खाली उतरला. त्याने रेल्वे ट्रॅकवरील मोठा दगड उचलला आणि डब्याच्या दिशेने भिरकावला.

advertisement

दुर्दैवाने, हा दगड वादात नसलेल्या निशांत खत्री यांच्या डोळ्याला अत्यंत वेगाने लागला. दगड लागताच निशांत रक्तबंबाळ झाले आणि डब्यात एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांची 'सुपरफास्ट' कारवाई...

रेल्वे पोलिसांनी निशांत खत्री यांचा जबाब नोंदवून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम आणि उपनिरीक्षक एम.बी. बच्छाव यांच्या पथकाने वांद्रे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले. तपासात संशयित आरोपी दादर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात करा एरंडी शेती, मिळेल पैसाच पैसा, कशी कराल लागवड? Video
सर्व पहा

योगेंद्र वंशराज (वय २६ वर्ष) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या वसईत मजुरीचे काम करतो. पोलीस चौकशीत त्याने रागाच्या भरात दगड मारल्याची कबुली दिली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Clash: लोकलमध्ये राडा, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा डोळा फुटला, ३२ तासांत आरोपी अटकेत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल