TRENDING:

Mumbai Metro : मेट्रोमध्ये आता मोबाईल पूर्णपणे बंद राहणार; प्रवाशांना मोठा धक्का, नक्की कारण काय?

Last Updated:

Mumbai Metro News : मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गिकेत आता प्रवाशांना मोबाईल वापरता येणार नाही.यामागील कारण काय आहे आणि कधीपासून हा निर्णय बदलण्यात येणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व प्रकार समोर येताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेट्रोमध्ये आता मोबाईल पूर्णपणे बंद राहणार;
मेट्रोमध्ये आता मोबाईल पूर्णपणे बंद राहणार;
advertisement

फोन पूर्णपणे डेड राहणार

गेल्या काही दिवसांपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून भुयारी मेट्रोनेही असंख्यजण प्रवास करत आहेत. पण भुयारी मेट्रोच्या दक्षिण मुंबईतील स्थानकांत प्रवाशांना इंटरनेट सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अजूनही या स्थानकांच इंटरनेट सेवा सुरु झाली नाही. आता दुसऱ्या बाजूला आरे ते बीकेसीपर्यंत सुरु असलेली इंटरनेट सेवाही आता बंद करण्यात आलेली आहे.

advertisement

नेमके कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार,जी इंटरनेटसाठी यंत्रणा उभी करणारे कंत्राटदार होते, त्यातील कंत्राटदराने कंत्राटातील अटी आणि शर्थींचे उल्लंघन केले असल्याने एमएमआरसीएलने हे कंत्राट रद्द केले आहे.

मेट्रो 3 आरे ते कफ परेड ही भुयारी मार्गिका 33.5 किमीची असून ऑक्टोबर 2024 मध्ये आरे ते बीकेसी हा टप्पा सुरु करण्यात आलेला होता. मग यानंतर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा 2025मध्ये सुरु करण्यात आला आणि त्यात सर्व भुयारी मार्गिकांमध्ये इंटरनेट सेवा देण्यात आली होती. मात्र आता काही महिन्यात सुरु करण्यात आलेल्या आचार्य आत्रे ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलेली नाही.

advertisement

यावर पर्याय म्हणून लवकरच नव्याने ही यंत्रणा उभारण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा भुयारी मेट्रो स्थानकांत उपलब्ध असल्याचे एसएसआरसीएलकडून सांगण्यात आलेले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर एअरटेल आणि वोडाफोन तसेच जिओचे नेटवर्क प्रवाशांसाठी उपलब्ध होते. परंतू नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त प्रमाणात शुक्लाची मागणी केली जात असल्याचे कारण देत या कंपन्यांनी माघार घेतल. मग परत काही कंपन्यांची सेवा पुन्हा सुरु करण्यात एमएमआरसीएलला यश आले. मात्र आता ही यंत्रणा उभारणारी कंपनी तसेच सेवा पुरवठादार कंपन्यांमधील मतभेद कायम राहिलेले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मेट्रोमध्ये आता मोबाईल पूर्णपणे बंद राहणार; प्रवाशांना मोठा धक्का, नक्की कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल