बीएमसी इमारतीसमोर मोठी गर्दी
आझाद मैदानाच्या समोरच्या बाजूला असलेल्या बीएमसी इमारतीसमोर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली असून अनेकांनी तिथंच ठिय्या सुरू केला आहे. त्यावेळी वाजत गाजत मराठा बांधव जल्लोष करताना दिसतायेत. अशातच यावेळी एका मराठा आंदोलकाला चक्कर आली तो खाली पडला. एक तरुण खाली पडल्याचं दिसताच सर्वांना नाचगाणी थांबवली आणि तरुणाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुंबई पोलिसांचे कर्मचारी देखील तातडीने धावून आले.
advertisement
मराठा बांधव चक्कर आली अन्...
मुंबई पोलिसांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. बीएमसीसमोर आंदोलन करत असताना एका मराठा बांधव चक्कर येऊन खाली पडला. अचानक चक्कर येऊन रस्त्याला पडल्यानंतर मुंबई पोलिसांनी एम्बुलेंसची वाट न पाहता पोलीस गाडीत हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यावेळी इतर मराठा आंदोलकांनी तातडीने वाट मोकळी करून दिली आणि पोलिसांच्या गाडीला रस्ता मोकळा करून दिला.
अँब्युलन्सला मोकळी केली वाट
दरम्यान, काल मराठा बांधवांनी एका अँब्युलन्सला देखील वाट मोकळी करून दिल्याचं पहायला मिळालं. एक अॅब्युलन्स आली असताना मराठा बांधवांनी बँरिकेट्स बाजूला करून अॅब्युलन्सला जागा करून दिली होती. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.