दुपारी असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर
आठवड्याचा पहिलाच दिवस आणि मुंबईला पावसाने झोडपलं पहायला मिळतंय. आता मुंबईमध्ये सकाळी जे विद्यार्थी शाळेत आले आहेत त्यांच्या सुखरूप घरी पोहचण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच दुपारी असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबई पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.
advertisement
...तरच घराबाहेर पडा
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.
मुंबईची तुंबई
दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं पहायला मिळतंय. सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका थेट आता मध्य रेल्वे ला बसलेला पाहायला मिळतोय घाटकोपर कुर्ला सायन भागामध्ये मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे.. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली असून ठाण्याहून सीएसएमटी तसेच कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते