विद्यार्थिनीवर एक वर्षापेक्षा जास्त काळ अत्याचार
शाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही विद्यार्थ्याने किंवा पालकांनी अधिकृतरित्या कोणतीही तक्रार केली नाही. तसेच आरोपी शिक्षिकेने 2024 च्या एप्रिलमध्येच शाळेचा राजीनामा दिला होता. शिक्षिकेची गुरुवारी पोलिसांनी मानसिक चाचणी केली जेणेकरून भविष्यात ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे भासवू नये. विद्यार्थिनीवर एक वर्षापेक्षा जास्त काळ अत्याचार करण्यात आले होते, त्यामुळे शिक्षिका मानसिकदृष्ट्या अस्थिर होती का? याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याचा सकारात्मक निकाल समोर आला आहे.
advertisement
आरोपी डॉक्टर लंडनला फरार?
अँटी-अँझायटी गोळ्या लिहून देणारी आरोपी डॉक्टर लंडनला गेल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी हजर न राहिल्यास तिला लूकआउट सर्कल जारी केला जाऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टर लंडनला स्थलांतरित झाल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की शाळेतील कर्मचारी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत.
शारीरिकदृष्ट्याही अधिक नातं
पोलिसांनी सांगितलं की, शिक्षिकेच्या मानसिक आरोग्य चाचणीचा अहवाल तिच्या मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक होता. पोलिसांनी लैंगिक शोषणाबद्दल तिला विचारपूस केली तेव्हा तिनं सांगितले की तिचं नातं "शारीरिकदृष्ट्याही अधिक" होतं आणि तिला विद्यार्थ्याबद्दल अजूनही अशीच भावना आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या महिला शिक्षिकेवर लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि किशोर न्याय अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शिक्षिकेचे कागदपत्र देखील तपासले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कोरोना काळात शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. त्याआधी ती एका चांगल्या शाळेत शिकवायला होती.