हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार
आरोपी शिक्षिका विद्यार्थ्याला वारंवार हॉटेलमध्ये घेऊन जात असत आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत असत. डिसेंबर 2023 साली हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमासाठी नृत्य गट स्थापन करण्यात आला, त्यावेळी डान्स शिकवताना शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जवळीक वाढवली होती. त्यानंतर महिलेला विद्यार्थ्याला टार्गेट करून शारिरीक संबंध प्रस्थापित करत होती. अशातच आता पोलिसांनी फास आवळण्यास सुरूवात केली असून महिलेची चाचणी केली आहे.
advertisement
पोलिसांकडून शिक्षिकेची टेस्ट
शिक्षिकेची गुरुवारी पोलिसांनी मानसिक चाचणी केली जेणेकरून भविष्यात ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे भासवू नये. विद्यार्थिनीवर एक वर्षापेक्षा जास्त काळ अत्याचार करण्यात आले होते, त्यामुळे शिक्षिका मानसिकदृष्ट्या अस्थिर होती का? याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच शाळेला यासंदर्भात आधीच माहिती का? याची चौकशी देखील केली जात आहे. विद्यार्थ्यावर सुरू असलेला अत्याचार शिक्षिका अटक केल्यानंतर समोर आल्याचं शाळेकडून सांगण्यात आलंय. तसेच शिक्षिकेची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती, टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर नाही.
कोरोना काळात शिक्षिका म्हणून रुजू
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या महिला शिक्षिकेवर लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि किशोर न्याय अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शिक्षिकेचे कागदपत्र देखील तपासले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कोरोना काळात शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. त्याआधी ती एका चांगल्या शाळेत शिकवायला होती.