TRENDING:

Navi Mumbai : मराठी शाळांना कायमचे कुलूप?,नवी मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Navi Mumbai News : नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यात विशेषत महानगरपालिकेच्या मराठी शाळा वाचवण्याची मागणी वेळोवेळी करत असताना,नुकत्याच समोर आलेल्या निर्णयामुळे सर्वांजण अवाक् झालेले आहेत.
नवी मुंबईतील सर्व महापालिका शाळा आता इंग्रजी माध्यमात रूपांतरित होणार
नवी मुंबईतील सर्व महापालिका शाळा आता इंग्रजी माध्यमात रूपांतरित होणार
advertisement

मराठी शाळांना नवी मुंबई पालिकेचा कायमचा रामराम?

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहरात असलेल्या सर्व महापालिका शाळा आता टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यमांत बदलण्याचा निर्णय घेतलेला असून याबाबतचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आलेला आहे.

सभागृह नेते सागर नाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवणे तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांना करिअर संधी वाढवणे हा या मागील मुख्य हेतू आहेत शिवाय जे खाजगी शाळांपुरते मर्यादित असलेले इंग्रीजी माध्यमाचे शिक्षण हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करुन देण्याचा हा एक प्रयत्न असेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भारतीय स्वातंत्र्यासाठी इथं व्हायच्या बैठका, पुण्यातील ऐतिहासिक राम मंदिर, तुम्ही पाहिलंय का? Video
सर्व पहा

शाळांबाबत घेतलेला निर्णय सुरळीत पार पडावा यासाठी तो टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. पहिल्यांदा नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम सुरु करता येईल आणि सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे त्यांच्या सध्याच्या माध्यमातच सुरु राहणार आहे. याचा निर्णयामुळे महापालिका आणि खाजगी शाळांमध्ये असलेली दरी ही कमी होईल शिवाय आर्थिकदृष्टया दुर्बल आणि मध्यमवर्गीय घरातील कुटुंबीयांतील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षणही मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : मराठी शाळांना कायमचे कुलूप?,नवी मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल