आज सकाळी ८ वाजता बेंगळुरूहून येणारे इंडिगोचे विमान नवी मुंबईत लँड करणारे पहिले प्रवासी विमान ठरेल. तर, येथून पहिले उड्डाण हैदराबादसाठी होईल. सुरुवातीच्या टप्प्यात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि आकासा एअर या कंपन्यांमार्फत देशातील १६ प्रमुख शहरांशी थेट संपर्क जोडला जाणार आहे. पहिल्याच दिवशी सुमारे ४ हजार प्रवासी या विमानतळाचा लाभ घेतील असा अंदाज आहे.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आता प्रत्यक्ष सेवा सुरू होत असताना, सुरुवातीच्या काळात हे विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहील. या काळात दररोज २३ नियोजित उड्डाणे सुरू राहतील.
सध्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता २ कोटी इतकी आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून हे विमानतळ २४ तास सुरू करण्यात येईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही खऱ्या अर्थाने वेग घेईल.
