मुंबई : नायर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने 15 व्या मजल्यावरून उडी मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आग्रीपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 43 वर्षांच्या व्यक्तीने निवासी इमारतीच्या गच्चीवर 15 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
रोहित किशोर गुरभानी असं इमारतीवरून उडी मारणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. रोहित गुरभानी 2015 सालापासून नायर हॉस्पिटलमध्ये आरए (नोंदणी सहाय्यक) म्हणून काम करत होते. संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास त्यांनी इमारतीवरून उडी मारली.
advertisement
मुंबईतील आग्रीपाडा भागातल्या वोक्हार्ट रुग्णालयासमोरील तोपास इमारतीवरून रोहित गुरभानी यांनी उडी मारली. रोहित गुरभानी मागच्या 7-8 वर्षांपासून स्किझोफ्रेनियाने त्रस्त आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मानसोपचार सुरू होते. रोहित गुरभानी यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं? याचा शोध पोलीस घेत आहेत.