प्रिपेड टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे नवे भाडेदर जाहीर
विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रिपेड टॅक्सी सेवेसाठी नवे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. टॅक्सीचे साधारण भाडे दर रुपये 20.66 प्रति किलोमीटर ठेवण्यात आले असून अंतरानुसार भाडे आणि प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) लागू राहणार आहे. उदाहरणार्थ, 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह 155 रुपये भाडे आकारले जाईल. 10 किलोमीटरपर्यंत भाडे 258 रुपये तर 20 किलोमीटरपर्यंत 496रुपये इतके राहील. 42 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येक 2 किलोमीटरच्या टप्प्यानुसार भाडे आकारले जाणार आहे.
advertisement
तसेच प्रिपेड ऑटोरिक्षांसाठीही नवे भाडेदर जाहीर करण्यात आले आहेत. ऑटोरिक्षाचे मूलभूत भाडे 17.14 रुपये प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आले आहे. 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह 129 रुपये भाडे लागेल. 10 किलोमीटरपर्यंत 214रुपये तर 20 किलोमीटरपर्यंत 411 रुपये इतके भाडे राहणार आहे. 42 किलोमीटरनंतर टप्प्याटप्प्याने भाडे आकारले जाईल.
शासनाच्या धोरणानुसार विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर प्रवाशांसाठी टॅक्सी आणि रिक्षा थांबे असणे आवश्यक आहे. या नव्या व्यवस्थेमुळे आणि निश्चित भाडेदरांमुळे प्रवाशांना फसवणूक न होता पारदर्शक व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याचे पनवेलचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे
