TRENDING:

MHADA Home : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य! लॉटरी शिवाय घर घेण्याची संधी; कधी अन् कुठे अर्ज करायचा?

Last Updated:

How To Apply For MHADA Flats Online : म्हाडाने मुंबईतील विविध भागांतील 120 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईकरांसाठी स्वतःचे हक्काचे घर मिळवण्याची आणखी एक सुवर्णसंधी म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे. विविध भागांतील सदनिका विक्रीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत अर्ज कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
MHADA first come first serve flats in Mumbai
MHADA first come first serve flats in Mumbai
advertisement

"आधी येईल त्याला आधी घर"

मुंबईतील विविध भागांतील 120 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे.

अर्ज कुठे करावा?

या सदनिका यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे त्या शिल्लक राहिल्या होत्या. आता या घरांची थेट विक्री करण्यात येत आहे. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे.

advertisement

अर्जाची तारीख आणि ठिकाण जाणून घ्या

12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा तसेच सदनिका निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला 'बुक माय होम' हा पर्याय उपलब्ध होईल. त्यामध्ये इमारत, विंग, सदनिका क्रमांक आणि मजल्याची माहिती दिलेली असेल. उपलब्ध सदनिकांपैकी अर्जदार आपल्या पसंतीची सदनिका निवडू शकतो.

advertisement

सदनिका निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. ही रक्कम भरल्यानंतर म्हाडाकडून तात्पुरते देकार पत्र ऑनलाइन पद्धतीने दिले जाईल. एकदा अर्ज सादर झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे अर्जदारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासूनच अर्ज करावा असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

advertisement

कुठे आणि किती घरे?

म्हाडाने उभारलेल्या मुंबईतील विविध भागांमध्ये एकूण 84 सदनिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये शिंपोली (कांदिवली) येथील8, चारकोप सेक्टर–8 (कांदिवली) येथील 2, अँटॉप हिल–वडाळा येथील 27, तुंगा-पवई परिसरातील 44, पीएमजीपी मानखुर्द येथील 1, मालवणी–मालाड येथील 1 तसेच गायकवाड नगर, मालवणी-मालाड येथील 1 सदनिकेचा समावेश आहे.

advertisement

तसेच विकास नियंत्रण नियमावली 33(5) आणि 33(7) अंतर्गत मंडळाला मिळालेल्या एकूण 36 सदनिका नागरिकांसाठी विक्रीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत,त्यामध्ये घाटकोपर पूर्व येथील 2, कन्नमवार नगर (विक्रोळी) येथील 1, अँटॉप हिल-वडाळा येथील 8, भायखळा येथील 6, ताडदेव येथील 6, लोअर परळ येथील 4, शीव येथील 2 आणि जेव्हीपीडी, अंधेरी पश्चिम येथील 7 सदनिका समाविष्ट आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Home : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य! लॉटरी शिवाय घर घेण्याची संधी; कधी अन् कुठे अर्ज करायचा?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल