TRENDING:

पार्ले-जी कारखाना होणार इतिहासजमा, 21 इमारती पाडण्याचे आदेश; सुगंधी दरवळ देणारी आठवण आता फक्त फोटोंमध्येच उरणार

Last Updated:

पार्ले-जी बिस्किटांची विलेपार्लेतील ऐतिहासिक फॅक्टरी जमीनदोस्त होणार असून, ३९६१ कोटींच्या प्रकल्पात आधुनिक इमारती व १८५१ नवीन झाडे लावली जाणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अगदी शहरांपासून गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातील घरापर्यंत पोहोचलेलं पार्लेजी बिस्कीट, पार्ले बिस्कीट आणि त्यासोबतच्या आठवणीं मनात कायम राहतील पण याच पार्लेजी कंपनीची इमारत आता जमीनदोस्त होणार आहे. पार्लेजीनं लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक आठवणी दिल्या.
विले पार्ल्यात उतरल्यानंतर आता ही फॅक्टरी दिसणार नाही.
विले पार्ल्यात उतरल्यानंतर आता ही फॅक्टरी दिसणार नाही.
advertisement

या आठवणी आता फक्त मनातच उरणार आहेत. मुंबईतल्या विलेपार्ले स्टेशनवर उतरलं की, वाऱ्याच्या लहरीसोबत येणारा तो बिस्किटांचा गोड सुगंध फक्त आठवणींतच राहणार आहे. आता इथे पार्लेजी मिळायचं हे म्हणताही येणार नाही.

गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या घराघरांत पोहोचलेल्या पार्ले-जी बिस्किटांचा जन्म ज्या विलेपार्ल्यात झाला ती जागा अखेर जमीनदोस्त होणार आहे. ज्या भिंतींनी बिस्किटांचा प्रवास, अनेक आठवणी पाहिल्या आहेत.

advertisement

आठवणींची इमारत कोसळणार

विलेपार्ले येथील १३.५४ एकरवर पसरलेल्या या ऐतिहासिक आवाराला राज्य पर्यावरण प्राधिकरणाने व्यावसायिक पुनर्विकासासाठी मंजुरी दिली. या प्रकल्पांतर्गत तब्बल ३,९६१ कोटी रुपये खर्च करून अनेक व्यावसायिक इमारती, हायटेक पार्किंग टॉवर्स आणि आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. विलेपार्ले हा भाग विमानतळ फनेल झोनमध्ये येत असल्यामुळे या इमारतींची उंची २८ ते ३१ मीटरच्या दरम्यान मर्यादित ठेवली जाणार आहे.

advertisement

पुनर्विकासाच्या या प्रक्रियेत केवळ इमारतीच नाही, तर तिथला निसर्गही बदलणार आहे. या आवारात सध्या ५०८ डेरेदार झाडे आहेत, ज्यांनी अनेक पावसाळे आणि उन्हाळे पाहिले. त्यापैकी १२९ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाईल, तर ६८ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. मात्र, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विकासकाने तिथे १८५१ नवीन झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यात १२०० झाडांच्या मियावाकीचा समावेश असेल.

advertisement

पार्लेकरांसाठी भावनिक क्षण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बेसन ढोकळ्यापेक्षा भारी, घरीच बनवा मटारपासून खास रेसिपी, खाल एकदम आवडीने
सर्व पहा

विलेपार्लेकरांसाठी ही फॅक्टरी केवळ एक इमारत नव्हती, तर त्यांच्या ओळखीचा एक भाग होती. पार्ले बिस्किट फॅक्टरी हे नाव तिथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी एक महत्त्वाचा लॅण्डमार्क होता. मुंबई महानगरपालिकेकडून कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळाल्यामुळे आता लवकरच तिथे पाडकामाला सुरुवात होईल. १.९० लाख चौरस मीटरचे हे भव्य बांधकाम पार्लेचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
पार्ले-जी कारखाना होणार इतिहासजमा, 21 इमारती पाडण्याचे आदेश; सुगंधी दरवळ देणारी आठवण आता फक्त फोटोंमध्येच उरणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल