मटार ढोकळा साहित्य
1 वाटी रवा, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, 2 मिरच्या, एक आल्याचा तुकडा, कोथिंबीर, जिरे, मोहरी, कडीपत्ता, इनो, तेल, लाल तिखट एवढेच साहित्य याकरता लागणार आहे.
advertisement
मटार ढोकळा कृती
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये रवा टाकायचा. त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आणि 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी मटार घालून घ्यायचं. 2 मिरच्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची.
आपण जे मिश्रण केले होते त्यामध्ये मटारचे मिश्रण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. एक चमचा तेल घालून घ्यायचं आणि एक इनो पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि मिक्स करायचे. आता एका खोलगट भांड्यात तेल लावून घ्यायचे आणि ते तयार केलेले मिश्रण टाकायचं त्यामध्ये आणि वरून थोडे तिखट टाकायचं. आता 15 ते 20 मिनिटे स्टीम करून घ्यायचे आहे.
ह्याकरिता एक तडका मोहरी, जिरे आणि कडीपत्त्याचा तयार करून घ्यायचा आहे. ढोकळा तयार झाला की त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचे. तयार केलेली फोडणी टाकून घ्यायची आणि त्याचे काप करून घ्यायचे. तुम्ही हा मटार ढोकळा टोमॅटो केचप किंवा चटणी सोबत खाऊ शकता. तर घरी नक्की ट्राय करा.





