अनवली गावात राहणाऱ्या अनंत मेटकरी यांनी पारंपरिक पीक न घेता एका एकरामध्ये आफ्रिकन मोहगणी झाडांची लागवड केली आहे. तर त्यामध्ये आंतरपीक म्हणून जांभळ तसेच गुलाबांची शेती केली आहे. एका एकरात 450 आफ्रिकन मोहगणीची झाडे आहेत. तर त्यामध्ये 150 पेक्षा अधिक जांभळांची झाडे आहेत. तर 500 पेक्षा अधिक गुलाबांच्या फुलांच्या रोपांची लागवड मेटकरी यांनी केली आहे. मोहगणी झाडांपासून दहा वर्षानंतर उत्पन्नाला सुरुवात होते. या आफ्रिकन मोहगणी झाडांपासून मिळणाऱ्या लाकडापासून मोठमोठी जहाजे, दरवाजे, खिडक्या, फर्निचर आदी वस्तू बनवल्या जातात. तर या झाडांपासून एकदा बनवलेल्या वस्तू जवळपास 100 वर्षांपर्यंत टिकतात.
advertisement
एका एकरात मोहगणीची लागवड करण्यासाठी अनंत मेटकरी यांना जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर दहा वर्षानंतर या झाडांपासून अनंत मेटकरी यांना एक ते दीड कोटींचा फायदा या मोहगणीच्या झाडांपासून मिळणार आहे. जांभळाच्या झाडांपासून उत्पन्नाला अजून सुरुवात झाली नाही. तर गुलाबांच्या फुलांच्या विक्रीतून दररोज अनंत मेटकरी यांना 1 ते 2 हजार रुपये मिळत आहेत. कमी क्षेत्रफळामध्ये शेतीचे योग्य नियोजन करून शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल, असा सल्ला शेतकरी अनंत मेटकरी यांनी दिला आहे.





