TRENDING:

सकाळी जंगलात जातो अन् सायंकाळी घरी येतो, आजीसोबत राहतो मोर, सिंधुदुर्गमधील अनोखी कहाणी!

Last Updated:

sindhudurg nique story - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील असरोंडी या गावात चक्क एका घरात एका 75 वर्षाच्या आजींसोबत मोर राहतो. अनेकांना विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. असरोंडी या गावातील निर्मला राणे या आजी यांची ही कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सितराज परब, प्रतिनिधी
advertisement

सिंधुदुर्ग - मोर हा कुक्कुट वर्गीय पक्षी असून या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्ष्याला भारताचा राष्टीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक ठिकाण असं आहे, जिथं एका आज्जीबाईसोबत मोर राहतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील असरोंडी या गावात चक्क एका घरात एका 75 वर्षाच्या आजीसोबत मोर राहतो. अनेकांना विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. असरोंडी या गावातील निर्मला राणे या आजी यांची ही कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

advertisement

या आजी एकट्याच राहतात. त्यांचे घर जंगलाच्या बाजूला आहे. 9 वर्षांपूर्वी जंगलातून 2 मोराची पिल्ले या आजीच्या घराजवळ आली आणि आजीच्या पाळलेल्या कोंबड्यासोबत राहू लागले. काही दिवस त्या मोरांचा हा दिनक्रम चालू होता. त्यातील एक मोराचे पिल्लू काही दिवसांनी यायचे बंद झाले आणि नंतर हे दुसरे मोराचे पिल्लू कोंबड्यासोबत घरातच राहू लागले.

advertisement

कोल्हापूरचा शाही दसरा, 89 वर्ष झाली तरी आजही आहे “मेबॅक कार"चं आकर्षण, कारण काय?

जसे जसे तो मोर मोठा होत गेला, तसतसा त्या मोराला आजीचा व आजीला देखील मोराचा लळा लागला. सध्या तो मोर आजीशिवाय राहतच नाही. आजीच्या आवाजावर तो लगेच असेल तिथून लगेच घरी येतो. आजीच्या आजूबाजूलाच घरा शेजारी फिरत असतो. जंगलात जरी गेला तरी फिरून परत घरी येतो.

advertisement

आजीने देखील त्याला मुलाप्रमाणे वाढवल्याने आजीचे व मोराचे हे नाते घट्ट झाले आहे. त्या मोराला लहानपणापासूनच आजीने मुक्त सोडलेले आहे. कुठेही बंदिस्त न करता तो मोर जंगलात फिरून घरी येतो. आजीदेखील त्याची तशीच काळजी घेते. त्याचे खाणे, पिणे याची योग्य काळजी घेतली जातो. एकीकडे माणसा माणसातील नाती कमजोर होत असताना, या आजीचे व मोराचे हे नाते डोळ्यात पाणी आणणारे नक्कीच आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
सकाळी जंगलात जातो अन् सायंकाळी घरी येतो, आजीसोबत राहतो मोर, सिंधुदुर्गमधील अनोखी कहाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल