कोल्हापूरचा शाही दसरा, 89 वर्ष झाली तरी आजही आहे "मेबॅक कार"चं आकर्षण, कारण काय?

Last Updated:

kolhapur shahi dasara - आज या कारला साधारण 89 वर्ष पूर्ण झाली. एकंदरीतच या कारच आकर्षण 89 वर्षांपासून आजही कायम आहे. विजयादशमी दिवशी कोल्हापुरातील शाही घराण्यातील कुटुंब हे सिमोल्लंघनासाठी मेबॅकमधूनच ऐतिहासिक दसरा चौकात येते. कोल्हापूरकरांना अजूनही ही मेबॅक कार का भुरळ घालते, हे जाणून घेऊयात.

+
मेबॅक

मेबॅक कार कोल्हापूर शाही दसरा

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : जगप्रसिद्ध असणारा कोल्हापूरचा शाही दसरा याचे आजही सर्वांना कुतूहल असते. अलीकडच्या काळात त्याचा राजेशाही थाट जरी कमी झाला असला तरी परंपरा जपणारा तो उत्साह आजही कायम असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विजयादशमी दिवशी नवा राजवाडा ते दसरा चौक दरम्यान निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि सोने लुटायला झालेली कोल्हापूरकरांची तोबा गर्दी, हे या शाही दसऱ्याचे खास वैशिष्ट्य आहे.
advertisement
हा शाही थाट गेल्या अनेक वर्षापासून आजही कायम राहिल्याने भारतात कोल्हापूरचा हा दसऱ्यावेळी होणारा सोहळा आजही चर्चेचा विषय ठरतो. यात कोल्हापूरकरांना मेबॅक कारचे विशेष आकर्षण असते. आज या कारला साधारण 89 वर्ष पूर्ण झाली. एकंदरीतच या कारच आकर्षण 89 वर्षांपासून आजही कायम आहे. विजयादशमी दिवशी कोल्हापुरातील शाही घराण्यातील कुटुंब हे सिमोल्लंघनासाठी मेबॅकमधूनच ऐतिहासिक दसरा चौकात येते. कोल्हापूरकरांना अजूनही ही मेबॅक कार का भुरळ घालते, हे जाणून घेऊयात.
advertisement
कोल्हापूरकरांना अजूनही भुरळ घालते मेबॅक कार -
संस्थान काळातील शाही दसरा म्हणजे पूर्वी सहा हत्ती, तोफा, दोनशेहून अधिक घोडे, उंट आणि चित्त्याचा समावेश असायचा. हा छबीना नगारा, हलगी, आणि चौघडांच्या गजरात निघायचा. हळूहळू या दसरा सोहळ्यात मोठे बदल झाले. पूर्वीच्या मिरवणुकीतील हत्ती-घोडे-उंट या लवाजम्यातील वाहनांची जागा स्वयंचलित वाहनांनी घेतली. यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील हत्तीच्या रथाची जागा छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात मेबॅक कारने घेतली. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील मेबॅक कारचे जतन पुढे छत्रपती शहाजी महाराज यांनी केले. ही मेबॅक कार आजही कोल्हापुरच्या शाही दसऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे.
advertisement
मेबॅक कारची वैशिष्ट्य काय आहेत -
जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर अशीच गाडी वापरल्याची नोंद आहे, यामुळे या गाडीला 'हिटलर रोल्स' असाही म्हटले जाते. काही कारणाने या कंपनीने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मेबॅकचे उत्पादन बंद केले. यामुळे जगभरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कार आता शिल्लक आहेत. ही कार आजही सुस्थितीत असून त्याचा वापर फक्त विजयादशमी दसऱ्या दिवशीच केला जातो. म्हणून याला शाही दसऱ्याची शान असेही म्हटले जाते.
advertisement
छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन 1936 च्या सुमारास इंग्लंड येथील 'रोल्स राईस' या कंपनीला मेबॅक गाडी बनविण्याची ऑर्डर दिली. यात वैशिष्ट्य म्हणजे ही कार मेक टू ऑर्डर पद्धतीने बनवण्यात आलेली आहे. यामुळे कोल्हापूर (करवीर) संस्थानच्या ध्वजाचा रंग (सॅफरॉन), छत्रपतींचा शिक्का (मोर्चेल), शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानी अशी वैशिष्ट्ये मेबॅकवर एकवटली आहेत.
advertisement
गाडीचा मूळ क्रमांक (वीवायएफ 8776) हा असा होता. मात्र, कोल्हापुरात आणल्यानंतर या गाडीचा क्रमांक कोल्हापुर 1' असा करण्यात आला. मेबॅक कारची लांबी 17 फूट,आणि 6 फूट रुंद आहे. या कारमध्ये साधारण 6 लोक ऐसपैस बसू शकतात. हाताच्या बोटाने ऑपरेट करता येणारी गिअर सिस्टीम, 200 लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक, रेल्वेच्या शिटीसारखा पण कर्णकर्कश नसणारा हॉर्न, उन्हाचा त्रास न होणाऱ्या पोलोराईज्ड ग्लासच्या काचा अशा अनेक वैशिष्ट्यांनी ही कार परिपूर्ण बनवली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरचा शाही दसरा, 89 वर्ष झाली तरी आजही आहे "मेबॅक कार"चं आकर्षण, कारण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement