आरोग्याची काळजी महत्त्वाची!, उपवास सोडताना असा ठेवा तुमचा आहार
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
health tips in marathi - नवरात्रीत उपवास केल्यानंतर आज उपवास सोडताना तुमचा आहार कसा असावा, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला अपचनाचा किंवा अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. या सर्व विषयावर लोकल18 च्या टीमने आहारतज्ञ कांचन बापट यांच्याशी विशेष संवाद साधला.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शारदीय नवरात्र उत्सवाची आज समाप्ती होत असून दसरा सणाचा उत्साहसुद्धा पाहायला मिळत आहे. नवरात्रीत अनेक जणांनी 9 दिवस उपवास केले असतील आणि आज सर्वजण उपवास हे सोडणार आहेत. नवरात्रीत उपवास केल्यानंतर आज उपवास सोडताना तुमचा आहार कसा असावा, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला अपचनाचा किंवा अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. या सर्व विषयावर लोकल18 च्या टीमने आहारतज्ञ कांचन बापट यांच्याशी विशेष संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आज ज्यांनी 9 दिवस उपवास केले आहेत ते आज उपवास सोडणार आहेत. जर तुम्ही गवल्याची खीर खाऊन जर उपवास सोडला तर खूप छान होईल. त्यासोबतच तुम्ही पुरणपोळी आणि दुध खाऊन देखील हा उपवास सोडू शकता. अनेक ठिकाणी धपाटे देखील करतात. त्यामुळे तुम्ही धपाटेही खाऊन हा उपवास सोडू शकता. या दिवशी तुम्ही सौम्य सात्विक असाच आहार घ्यावा. जास्त तेलकट किंवा तळणीचे पदार्थ तुम्ही खाऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
advertisement
उपवास सोडल्यानंतर तुम्ही जास्त देखील आहार घेऊ नका. सकाळी थोडा आणि संध्याकाळी थोडा आहार घेऊनच तुम्ही उपास सोडावा. जास्त आहार घेतला तर तुम्हाला याचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे कमी आहार घेऊनच तुम्ही उपास सोडायला हवे. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये तुम्ही फळांचा पालेभाज्यांचा देखील समावेश करावा. अशा पद्धतीने जर तुम्ही आहार घेतला तर तुम्हाला कुठलाही अॅसिडिटीचा किंवा अपचनाचा त्रास होणार नाही, अशी माहिती आहारतज्ञ कांचन बापट यांनी दिली.
advertisement
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 12, 2024 1:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आरोग्याची काळजी महत्त्वाची!, उपवास सोडताना असा ठेवा तुमचा आहार