advertisement

Shocking : भाजी मार्केटमध्ये चिमुरडीला बनवले लक्ष्य; आजीसोबत असतानाच घडला भयंकर प्रकार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Last Updated:

Gold Chain Snatching Video : सोशल मीडियावर सध्या एका तरुणीच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने कशा प्रकारे सर्वांसमोरी चोरी केली.व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हादरुन गेला आहे.

Gold chain snatching incident in Borivali Kajupada
Gold chain snatching incident in Borivali Kajupada
मुंबई : मुंबईत लूटमार आणि चोरीच्या घटना वाढत असल्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत. चोर दरवेळी नवनवीन पद्धती वापरून लोकांना फसवतात. कितीही हुशार असले तरी पोलिस त्यांना पकडतात पण चोरीचे प्रकार थांबत नाहीत. संधी मिळताच चोर छोट्या रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत काहीही लुटण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
भाजी घेताना तरुणीने दाखवली हातचलाखी
अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील बोरीवली परिसरात घडली आहे. काजूपाडा भागात एका लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका तरुणीने हिसकावून नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, एक लहान मुलगी तिच्या आजीसोबत भाजी खरेदी करत उभी आहे. त्याच वेळी एक तरुणी त्यांच्या शेजारी येऊन उभी राहते. सुरुवातीला ती मुलीच्या गळ्यातील साखळी चोरण्याचा प्रयत्न करते पण पहिल्यांदा ती चोरी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाली नाही मात्र त्यानंतर ती भाजी घेण्याचे नाटक करते. काही क्षणांनी बॅगेतून हात काढत ती मुलीच्या गळ्यातील साखळी तोडते आणि लगेच तेथून पळ काढते.
advertisement



 










View this post on Instagram


advertisement
'त्या' तरुणीचा शोध सुरू
मुलीच्या आजीला काहीतरी संशय आल्याचे दिसते पण तोपर्यंत आरोपी तरुणी तिथून निघून गेलेली असते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : भाजी मार्केटमध्ये चिमुरडीला बनवले लक्ष्य; आजीसोबत असतानाच घडला भयंकर प्रकार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement