प्रवास सुरू करण्यापूर्वी तिला सी लिंकवर दुचाकींना परवानगी नसल्याचं माहीत नव्हतं. मात्र, सी लिंकच्या प्रवेशद्वारावरील फलकाकडेही तिने दुर्लक्ष केलं. पोलीस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ती थांबली नाही. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक नियंत्रण आणि मुख्य नियंत्रण कक्षाला या घटनेबद्दल सतर्क केलं. तरुणीला बाहेर पडताना दिसलं की पोलीस तिची वाट पाहात आहेत.
advertisement
रायगडमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई; तब्बल 5 टन मागूर मासे केले नष्ट
पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणीला तिचा लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे मागितली असता तिने सहकार्य करण्यास नकार दिला. पोलिसांनी तिला आपल्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं, तेव्हा तिने पिस्तुलाच्या आकाराची वस्तू काढून पोलिसांना म्हटलं, की ती गोळी घालू शकते. मात्र, ही वस्तू सिगारेट लायटर असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी लायटर आणि दुचाकी जप्त करून तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं, त्यानंतर तिच्या भावाला माहिती दिली.
पोलिसांनी तरुणीविरुद्ध कलम 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळ), 186 (एखाद्या सार्वजनिक सेवकाला त्याच्या सार्वजनिक कार्यात हेतुपुरस्सर अडथळा आणणे), 279 (रॅश ड्रायव्हिंग), 336 (336) अंतर्गत एफआयआर दाखल केला.