प्रवाशांना आता किती रुपये जास्त मोजावे लागणार?
महत्वाचे म्हणजे एसटी महामंडळाने या बदलामुळे तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गावर बसगाड्यांना अधिक अंतर कापावे लागणार असल्याने प्रवास खर्च नैसर्गिकरीत्याच वाढणार आहे. परिणामी, प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी तिकिटाच्या दरात तब्बल 10 रुपयांची जादा रक्कम मोजावी लागणार आहे. साधारण प्रवासी, विद्यार्थी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला या वाढीचा मोठा फटका बसणार आहे.
advertisement
दररोज हजारो प्रवासी परळ आगारातून सुटणाऱ्या बसांचा वापर करून मुंबईच्या विविध भागात किंवा इतर जिल्ह्यांत प्रवास करतात. मात्र, पूल बंद झाल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक वेळखाऊ होणार आहे. आधीच मुंबईतील वाहतुकीची बिकट परिस्थिती, ट्रॅफिक जॅम, आणि उशीराने पोहोचणे या समस्या प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. आता त्यात तिकिट वाढीचा बोजा अधिक होणार आहे.
स्थानिक नागरिक तसेच प्रवासी संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे पूल बंद करणे आवश्यक आहे हे आम्हाला मान्य आहे. मात्र, त्याचा थेट बोजा प्रवाशांवर टाकणे योग्य नाही. तिकिट दर वाढविण्याऐवजी सरकार किंवा एसटी प्रशासनाने पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
एसटी प्रशासनाच्या मते, नवीन मार्गावर बसगाड्यांना सरासरी काही किलोमीटर अतिरिक्त अंतर पार करावे लागते. त्यामुळे इंधन खर्च, चालक-वाहक यांचा वेळ आणि देखभाल खर्च यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तिकीट दर 10 रुपयांनी वाढविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे ते सांगत आहेत.
पूल दुरुस्तीसाठी किती कालावधी लागेल, तसेच तो पुन्हा कधी प्रवाशांसाठी खुला होईल याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, तोपर्यंत परळ आगारातून निघणाऱ्या एसटी बस प्रवाशांना नव्या मार्गाने आणि वाढीव दराने प्रवास करावा लागणार आहे