TRENDING:

NCP: प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर नवी जबाबदारी, राष्ट्रवादीच्या अधिवेशनात घोषणा

Last Updated:

मागील महिन्याभरात राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला. आता राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन मुंबई पार पडलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण होत आहे. मागील महिन्याभरात राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला. आता राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन मुंबई पार पडलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता  प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर प्रदेशाध्यक्षपदी  सुनिल तटकरेंची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

मुंबईतील वरळी इथं राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर प्रदेशाध्यक्षपदी  सुनिल तटकरेंची पुन्हा एकदा निवड करण्यात आली, याबद्दलची घोषणा केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हातात आलेलं पीक अवकाळीने गेलं, द्राक्षांचे 25 लाखांचे नुकसान, शेतकरी संकटात
सर्व पहा

"पहिल्या पाच वर्षात अजित पवार १९९५ मधे काम करत होते १९९९ साली मंत्रिमंडळात शरद पवारांनी संधी दिली त्यानंतर अनेक पदवर काम करण्याची संधी दिली. अजित पवार राज्याचे नेतृत्व करत असताना सलग पुणे जिल्ह्यावर लक्ष होतं. त्यानंतर अनेक ठिकाणी मला संधी मिळाली. आज अजित पवार राहिले नाहीत. १८ जानेवारीला शेवटची भेट झाली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भेटलो. २७ तारखेला मी दवाखान्यात एडमिट झालो आणि २८ तारखेला घटना घडली. मी तशाही परिस्थिती बारामतीला गेलो. त्यांच्या जाण्याने वेगळी पोकळी निर्माण झाली आहे. दादांच्या विमानाला अपघात झाला की काय झालं याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रफुल्ल पटेल हे पुन्हा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सुनिल तटकरेंची प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड केली आहे, छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आहे,  असं यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
NCP: प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर नवी जबाबदारी, राष्ट्रवादीच्या अधिवेशनात घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल