TRENDING:

Mumbai Metro : दहिसर-काशीगाव मेट्रो सज्ज; मुख्यमंत्री लवकरच करणार लोकार्पण,तारीख ठरली

Last Updated:

Mumbai Metro 9 : दहिसर ते मिरा भाईंदरदरम्यानची मेट्रो 9 सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या काही काळापासून मीरा-भाईंदरकर ज्या मेट्रो सेवेची वाट पाहत होते, आता ते स्वप्न पूर्णत्वास होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी काशीगाव मेट्रो स्थानकाची पाहणी करत सुरक्षेच्या सर्व बाबींची तपासणी केली. मेट्रो 9 च्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षा प्रमाणपत्रांची पूर्तता शेवटच्या टप्प्यात असून एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते या मेट्रोचे लोकार्पण होणार आहे.
दहिसर ते मिरा भाईंदरदरम्यान धावणारी मेट्रो ९ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता
दहिसर ते मिरा भाईंदरदरम्यान धावणारी मेट्रो ९ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता
advertisement

दहिसर-काशीगाव मेट्रो सज्ज

मेट्रो मार्गिकेच्या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी आत्पकालीन यंत्रणा तसेच दुर्घटना नियंत्र कक्ष आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा याबाबतच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेतला. त्यात त्यांनी म्हटलं की ''प्रवासाला थोडा उशीर झाला तरी चालेल मात्र प्रवाशांच्या सु्रक्षेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही''

तासाला 4,500 प्रवाशांची सोय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

ही मेट्रो सुरु होताच या मार्गिकेमुळे तासाला साधारण 4 हजार 500 प्रवसी प्रवास करु शकणार आहेत. दररोज जवळपास 50 हजार नागरिकांना सुरक्षित तसेच वेगवान सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष बाब म्हणजे मीरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : दहिसर-काशीगाव मेट्रो सज्ज; मुख्यमंत्री लवकरच करणार लोकार्पण,तारीख ठरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल