TRENDING:

Mumbai News: काय सांगता! मुंबईमध्ये या ठिकाणी ८० रुपयांपासून मिळतंय प्रीमियम मंगळसूत्र आणि गंठण

Last Updated:

सणासुदीचा हंगाम सुरू होताच बाजारपेठांमध्ये खरेदीस चांगलाच वेग आला आहे. विशेषतः महिलांमध्ये पारंपरिक व आकर्षक दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी आणि लग्नसराईचे दिवस जवळ येत असल्याने ग्राहकांचा कल पारंपरिक पोशाखासोबत जुळणाऱ्या सुंदर दागिन्यांकडे वाढला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सणासुदीचा हंगाम सुरू होताच बाजारपेठांमध्ये खरेदीस चांगलाच वेग आला आहे. विशेषतः महिलांमध्ये पारंपरिक व आकर्षक दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी आणि लग्नसराईचे दिवस जवळ येत असल्याने ग्राहकांचा कल पारंपरिक पोशाखासोबत जुळणाऱ्या सुंदर दागिन्यांकडे वाढला आहे.
advertisement

हीच गरज ओळखून मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या क्रिस्टल प्लाझा या कॉम्प्लेक्समधील कुसुम इमिटेशन ज्वेलरी शॉप महिलांसाठी एक खास आकर्षण ठरत आहे. येथे प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र, गंठण, आणि इतर इमिटेशन दागिने होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहेत.

advertisement

या दुकानात मंगळसूत्र आणि गंठण फक्त 80 रुपयांपासून सुरू होतात. 120, 250, 335 अशा विविध किंमतींमध्ये आणि डिझाइन्समध्ये पर्याय पाहायला मिळतात. पूर्ण कोपर लाँग मंगळसूत्र फक्त 470 रुपयांना तर गंठण विथ इयरिंग्स 470 ते 636 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत जे ग्राहकांच्या बजेटमध्ये अगदी फिट बसतात.

advertisement

भारतामधून खरेदी करत असाल तर किमान 3000 ची खरेदी अनिवार्य आहे. तर भारताबाहेरील ग्राहकांनी किमान 10000 च्या खरेदीसह व्यवसाय स्वरूपात खरेदी करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ग्राहक प्रत्यक्ष येऊ शकत नसतील तर व्हिडिओ कॉलद्वारे खरेदीची सुविधाउपलब्ध आहे.येथे सिंगल पीस विकला जात नाही. प्रत्येक डिझाइनचे किमान 3 पीस घ्यावे लागतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी कुसुम इमिटेशन ज्वेलरी एक उत्तम संधी ठरू शकते. दर्जेदार उत्पादने भरपूर व्हरायटी आणि योग्य दर यामुळे यशस्वी व्यवसायाची ही एक खात्रीशीर सुरुवात ठरू शकते.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: काय सांगता! मुंबईमध्ये या ठिकाणी ८० रुपयांपासून मिळतंय प्रीमियम मंगळसूत्र आणि गंठण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल