TRENDING:

मेट्रो 9 धावण्यापूर्वीच वादाची ठिणगी; मुंबईच्या महापौरांनाच पोलिसांनी गेटवर रोखले, दहिसर स्थानकात तणाव

Last Updated:

Metro Line 9 : मुंबई मेट्रो 9 च्या उद्घाटन प्रसंगी दहिसर स्थानकावर गोंधळ उडाला. पोलिसांनी महापौर रितू तावडे आणि नगरसेवक मंगेश यांना प्रवेशद्वारावर अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. दहिसर ते काशिगा आणि गुंदवली म्हणजे अंधेरी या मेट्रो मार्गिकेचे आज दिमाखात उद्घाटन होणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर आणि दहिसरमधील प्रवाशांचा प्रवास आता अंधेरीपर्यंत सोपा होणार आहे. मात्र या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी दहिसर मेट्रो स्थानकावर एक अनपेक्षित प्रकार घडलेला आहे.
! मुंबईच्या महापौरांनाच पोलिसांनी गेटवर रोखले;
! मुंबईच्या महापौरांनाच पोलिसांनी गेटवर रोखले;
advertisement

नेमकं घडलं काय?

मेट्रो स्थानकाच्या गेटवर पोहोचताच पोलिसांनी मुंबई शहराच्या महापौर रितू तावडे यांना चक्क आत जाण्यापासून रोखले आहे. महापौरांसोबत नगरसेवक मंगेश यांनाही प्रवेश नाकारण्यात आल्याचे समजत आहे. लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकार अडवल्याने वातावरण लगेच तापले होते. त्यात संतापलेल्या नगरसेवकांनी पोलिशांची वाद घातला, ज्यामुळे तिथं मोठा गोंधळ उडाला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षे उद्योगात क्रांती होणार, पुणेकर शास्त्रज्ञांचा खास शोध, कसा आणि कुणाला फायदा? Video
सर्व पहा

सर्व परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी महापौरांच्या पीएला बाहेर काढले. पण हा संपू्र्ण कार्यक्रम भारतीय जनता पक्षाता असतानाच भाजपच्याच महापौरांना पोलिसांनी अडवले,त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकरामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून काही वेळ दहिसर मेट्रो स्थानकात तणावाचे वातावरण होते.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मेट्रो 9 धावण्यापूर्वीच वादाची ठिणगी; मुंबईच्या महापौरांनाच पोलिसांनी गेटवर रोखले, दहिसर स्थानकात तणाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल