TRENDING:

Raigad Fort : शिवभक्तांनो लक्ष द्या! रायगड पायी चढण्याच्या तयारीत राहा, रोप वे सहा दिवस बंद, पुन्हा कधी सुरू होणार?

Last Updated:

Raigad Fort Ropeway Update : किल्ले रायगडावरील रोप-वे सेवा सहा दिवस बंद राहणार आहे. चला तर जाणून घ्या यामागील कारण काय आणि कधी होणार सुरु.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : किल्ले रायगड येथे जाणाऱ्या प्रत्येकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. नेमका कोणता बदल करण्यात आलेला आहे ज्यामुळे पर्यटकांची गैरसोय होऊ शकते ते जाणून घ्या.
Raigad Fort ropeway closed from 23 to 28 February
Raigad Fort ropeway closed from 23 to 28 February
advertisement

पायी गड सर करण्याची हीच वेळ

रायगड येथे जाण्यासाठी सुरू असलेली रोप-वे सेवा 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान बंद राहणार आहे. वार्षिक तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रोप-वे प्रशासनाने दिली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार दरवर्षी सुरक्षिततेच्या दृष्टीने रोप-वेची सखोल तपासणी केली जाते. यामध्ये यंत्रसामग्रीची पाहणी, देखभाल आणि गरजेच्या दुरुस्त्या केल्या जातात. प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे या कालावधीत सेवा पूर्णपणे थांबवली जाणार आहे.

advertisement

परत कधी सेवा होणार सुरु?

रोप-वे सेवा 1 मार्चपासून पुन्हा नियमितपणे सुरू होईल. रायगडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना या सेवेचा मोठा फायदा होतो. त्यामुळे काही दिवस सेवा बंद राहणार असल्याने अनेकांना गैरसोय होऊ शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर...
सर्व पहा

या काळात गडावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांना पायऱ्यांच्या मार्गाचा वापर करावा लागेल. त्यामुळे पायरी मार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पर्यटकांनी आपला प्रवास आधीच नियोजन करून रोप-वे बंद राहण्याच्या तारखा लक्षात घ्याव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Raigad Fort : शिवभक्तांनो लक्ष द्या! रायगड पायी चढण्याच्या तयारीत राहा, रोप वे सहा दिवस बंद, पुन्हा कधी सुरू होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल