TRENDING:

Ratnagiri News : कल्याणच्या आंचलचा दापोलीत मृत्यू, परतीच्या प्रवासात आक्रित घडलं, कुटुंबावर शोककळा

Last Updated:

ख्रिसमसच्या सुट्टीसाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या आंचल सकपाळ या 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दापोली तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ratnagiri News : शिवाजी गोरे, रत्नागिरी (दापोली) : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुटट्या लागल्यामुळे सध्या सगळेच जण आपआपल्या आवडीच्या ठिकाणी पर्यटनाला निघाले आहेत. काही पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे.अशीच एक कल्याणची मुलगी दापोलीत पर्यटनासाठी गेली होती. दरम्यान सुट्टया संपल्यानंतर परतीच्या प्रवासाच्याच दिवशी अचानक तिचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. आंचल मदन सकपाळ (वय 13) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Ratnagiri News
Ratnagiri News
advertisement

ख्रिसमसच्या सुट्टीसाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या आंचल सकपाळ या 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दापोली तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. खरं तर आंचल सकपाळ ही मुळची मुंबईतील कल्याणची रहिवासी आहे. आंचल ही तिच्या कुटुंबियांपासून 25 डिसेंबर 2025 रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आली होती. आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये ती वास्तव्यास होती.

advertisement

दरम्यान दोन दिवस मनसोक्त मजा मस्ती केल्यानंतर आज ती मुंबईसाठी परतीचा प्रवास करणार होती. पण वास्तव्यास असताना परतीच्या प्रवासाच्या दिवशी सकाळी आंचल झोपेतच मृताअवस्थेत आढळून आली होती.यानंतर तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

आंचल ही कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी होती.प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असावा,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Ratnagiri News : कल्याणच्या आंचलचा दापोलीत मृत्यू, परतीच्या प्रवासात आक्रित घडलं, कुटुंबावर शोककळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल