पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एक तरुण अग्निवीर नौदलाच्या गणवेशात प्रवेशद्वारावरील बंदोबस्ताच्या कर्तव्यावर असलेल्या गार्डकडे आला. ‘मी अग्निवीर असून मला येथे ड्युटी देण्यात आली आहे’, असे त्याने त्या गार्डला सांगितले. त्यानंतर कर्तव्यावरील गार्डने स्वत:कडील रायफल आणि गोळ्या त्याच्याकडे सोपवल्या आणि तिथून निघून गेला. पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाच्या निवासी वसाहतीत घडली. सुरक्षेतील ढिलाईचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस आणि गुन्हे शाखेची अनेक पथके संशयित अग्निवीरचा शोध घेत आहेत. मात्र सीसीटिव्ही समोर आल्यानंतर हा प्रकार एका व्यक्तीने नाही तर यामध्ये दोन व्यक्ती सहभागी असल्याचे समोर आले आहे.
advertisement
काय दिसत आहे सीसीटिव्हीमध्ये?
नेव्हीनगरमधील मुख्यालयात एक व्यक्ती इन्सास रायफलला एका पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये भरत आहे. तसेच तो व्यक्ती 40 गोळ्या देखील त्या देखील त्याने या बॅगमध्ये भरल्या आहेत. नेव्हीनगरची तटरक्षक भिंतीवर चढतो तिथे थोडा वेळ थांबतो. पलीकडून एक काळ्या रंगाच्या शर्टात एक व्यक्ती येतो त्याच्याकडे फेकतो त्यानंतर तो व्यक्ती ती पिशवी घेऊन फरार होतो. हा व्यक्ती कोण आहे? याचा शोध घेतला जात आहे.
गोळ्यांनी भरलेली रायफल घेऊन संबंधित तरुण गायब झाल्याने एकच गोंधळ उडाला. नौदलाने याबाबत अंतर्गत शोध घेतल्यानंतर हा तरुण कुठेच न सापडल्याने याबाबत कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. कुलाबा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अनेक पथके तयार केली आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर पुराव्यांच्या आधारे संशयित अग्निवीर तरुणाचा कसून शोध सुरू जात आहे. नेव्ही, मुंबई पोलीस आणि एटीएस हायअलर्टवर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही चौकशी केली जात आहे. यानंतर संपूर्ण नेव्ही नगर परिसरात सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलंय.