मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुंबईत कोणाबरोबर जणार याबाबतची चर्चा सुरु होती. अखेर हा मुद्दा निकाली निघाला आहे.
मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ
शरद पवार यांच्या पक्षाची ठाकरे बंधूंबरोबर युती झालेली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीला शरद पवारांचा पक्ष आला आहे. त्यामुळं मुंबईत ठाकरे बंधूंना बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेस पक्षाबरोबर देखील चर्चा केली होती. मात्र, त्यांच्यासोबत जाण्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही. त्यानंतर अखेर ठाकरे बंधूबरोबर युती झाल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
| क्र. | वॉर्ड क्रमांक | उमेदवाराचे नाव | आरक्षण |
| 1 | 43 | श्री. अजित रावराणे | सर्वसाधारण |
| 2 | 140 | श्री. संजय भीमराव कांबळे | एस. सी. |
| 3 | 78 | श्रीमती रदबा जावेद देऊळकर | सर्वसाधारण महिला |
| 4 | 48 | अॅड. गणेश शिंदे | सर्वसाधारण |
| 5 | 170 | श्रीमती रूही मदन खानोलकर | ओबीसी महिला |
| 6 | 51 | श्रीमती आरती सचिन चव्हाण | सर्वसाधारण महिला |
| 7 | 112 | श्रीमती मंजू रविंद्र जायस्वाल | सर्वसाधारण महिला |
| 8 | 224 | श्रीमती सानिया कासिफ शाह | सर्वसाधारण (महिला) |
| 9 | 165 | श्री. अभिजीत दिलीप कांबळे | सर्वसाधारण |
| 10 | 107 | श्री. भरत हंसराज दनानी | सर्वसाधारण |
| 11 | 211 | श्री. सुफियान अन्सारी | सर्वसाधारण |
काय आहे मुंबईत ठाकरे- पवारांच्या युतीचं गणित?
मुंबईत शिवसेना-भाजपची युती विरुद्ध ठाकरेंची शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांच्या आघाडीत लढत होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने जागा वाटपासाठी प्रचंड संघर्ष होईल, असे बोलले गेले. परंतु ठाकरे बंधू आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेक बैठकांमधून साधक बाधक चर्चा करून सुवर्णमध्य काढत जागा वाटपाचे अवघड गणित सोडवले. मुंबईत ठाकरे गटाने मनसे आणि राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र ठरवले. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट 163 जागा, मनसे 53 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर लढत आहे.
