पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री किंवा 1 जानेवारी रोजीच्या सकाळी आपल्या मोबाईलवर एखादा लाॅटरी लगल्याचा किंवा नवीन वर्षाचे गिफ्ट असल्याचा मेसेज येवू शकतो. सोबतच एखादी एपीके फाईल देखील असेल.अशा प्रकारची फाईल किंवा लिंक अजिबात ओपन करू नका.
कांदा दरात मोठी घट, सोयाबीन आणि कापसाला किती मिळाला आज भाव? इथं चेक करा
advertisement
तुमची एक चूक अन् तुमच्या बॅंक खात्यात असलेले सगळे पैसे गायब होऊ शकतात. यामुळे नागरिकांना असा प्रकारच्या फसव्या आमिषांना बळी पडू नये. अशा प्रकारे आलेल्या मेसेज किंवा एपीके फाईल ला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देऊ नका. कोणत्याही प्रकारची मदत अथवा तक्रार करावयाची असल्यास सायबर हेल्पलाईन 1930 वर काॅल करावा, असं आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार संजय सोनवणे यांनी केलं आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या फसव्या कॉल मेसेज पासून वाचावे. आमिषांना बळी पडू नये. फेक कॉल मेसेज ला रिप्लाय करू नये. ज्यामुळे त्यांचेच आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होणार नाही. यासाठी नागरिकांनी स्वतः खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे देखील पोलिसांनी आपल्या व्हिडीओ संदेशात सांगितले आहे.





