5 टर्म भाजप खासदाराला हरवलं, महाराष्ट्रातला जायंट किलर काँग्रेस नेता दुबईत अडकला, दोन दिवसांपासून संपर्क होईना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला असून अनेक भारतीय आखाती राष्ट्रांमधील विविध देशांमध्ये अडकले आहेत.
Kalyan Kale in Dubai: शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराण देशावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई ठार झाला. या घटनेनंतर आता इराण चवथळला आहे. इराणने अनेक आखाती राष्ट्रांवर हल्ला चढवला आहे. संबंधित देशातील अमेरिकेच्या सैनिकी स्थळांना इराणकडून टार्गेट केलं जात आहे. यामुळे संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला असून अनेक भारतीय आखाती राष्ट्रांमधील विविध देशांमध्ये अडकले आहेत.
दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे देखील दुबईत अडकले आहेत. ते कामानिमित्त दुबईला गेले होते. मात्र आता दुबईत अनेक ठिकाणी इराणकडून हल्ला झाल्याने येथील हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे दुबईत अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा कुटुंबीयांसोबतचा संपर्क तुटला आहे.
advertisement
दोन दिवसांपूर्वी कल्याण काळे यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला होता. ते सुरक्षित असल्याचं त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. कल्याण काळे यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण काळे चर्चेत आले होते. त्यांनी जालन्यातून पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे सारख्या मातब्बर नेत्याला हरवलं होतं.
advertisement
त्यांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय संपादन केला होता. लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेला हा नेता आता दुबईत अडकल्याची माहिती समोर आल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या कल्याण काळे नेमकं कुठे आहेत? ते सुरक्षित आहेत का? याची कसलीच माहिती अद्याप समोर आली नाही. कुटुंबीयांकडून कल्याण काळेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
5 टर्म भाजप खासदाराला हरवलं, महाराष्ट्रातला जायंट किलर काँग्रेस नेता दुबईत अडकला, दोन दिवसांपासून संपर्क होईना







