advertisement

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत पवारांच्या उमेदवारीने काँग्रेसला 'टेन्शन', उद्धव ठाकरेंना कोणता प्रस्ताव?

Last Updated:

Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनाची मुदत ५ मार्च रोजी संपत असताना महाविकास आघाडीमध्ये प्रचंड राजकीय खलबतं सुरू आहेत. राज्यातील ७ जागांपैकी एक जागेवर महाविकास आघाडी विजयी होऊ शकते.

राज्यसभा निवडणुकीत पवारांच्या उमेदवारीने काँग्रेसला 'टेन्शन', उद्धव ठाकरेंना कोणता प्रस्ताव?
राज्यसभा निवडणुकीत पवारांच्या उमेदवारीने काँग्रेसला 'टेन्शन', उद्धव ठाकरेंना कोणता प्रस्ताव?
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनाची मुदत ५ मार्च रोजी संपत असताना महाविकास आघाडीमध्ये प्रचंड राजकीय खलबतं सुरू आहेत. राज्यातील ७ जागांपैकी एक जागेवर महाविकास आघाडी विजयी होऊ शकते. मात्र, या एकाच जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही एकवाक्यता होत नसल्याचे समोर आलं आहे. शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मविआत इच्छा असली तरी, यामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील 'विरोधी पक्षनेते पद' धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही संजय राऊत यांच्या भूमिकेवरून अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे.

काँग्रेसला 'विरोधी पक्षनेते' पद गमावण्याची धास्ती

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सध्या राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. हे पद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला दोन जागा निवडून आणणे अनिवार्य आहे. तेलंगणातून एक जागा निश्चित असली तरी महाराष्ट्रातील दुसरी जागा मिळवणे काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. जर ही जागा शरद पवारांना दिली आणि त्यांनी भविष्यात राजकीय भूमिका बदलली, तर काँग्रेसच्या हातून हे महत्त्वाचे पद जाऊ शकते. म्हणूनच, ही जागा पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांच्यासाठी राखली जावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. काँग्रेसने आपली अडचण ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली असल्याची चर्चा आहे.
advertisement

ठाकरे गटात अंतर्गत कलह?

खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केल्यामुळे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात चर्चा न करता निर्णय जाहीर करणे योग्य नाही, अशी भूमिका युवा नेत्यांनी घेतल्याचे समजते. आदित्य ठाकरे यांना प्रियांका चतुर्वेदींना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे होते. मात्र, काँग्रेस नेत्यांनी आमची सध्याची निकड लक्षात घेऊन पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली आहे.
advertisement
ठाकरे गटातही तूर्तास आता काँग्रेसला राज्यसभेसाठी पाठिंबा द्यावा आणि विधान परिषदेला आपल्याला पाठिंबा घ्यावा असा प्रस्ताव मांडला आहे. राज्यसभेच्या पुढील टर्मसाठी संजय राऊत यांच्या वेळी काँग्रेसचा पाठिंबा घेता येईल असेही ठाकरे गटातील काहींना वाटत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
र काँग्रेसची निकड पाहता शिवसेनेत आता राज्यसभा काँग्रेसला सोडून विधान परिषद पद पदरात पाडून घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत पवारांच्या उमेदवारीने काँग्रेसला 'टेन्शन', उद्धव ठाकरेंना कोणता प्रस्ताव?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement