आज होळीच्या दिवशी PM Kisan चे २,००० रु शेतकऱ्यांना मिळणार? नवीन अपडेट काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या २२ व्या हप्त्याकडे लागले आहे.
मुंबई : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या २२ व्या हप्त्याकडे लागले आहे.
होळीला हप्ता येण्याची शक्यता कमी
मार्च महिन्याच्या सुरुवातीला विविध राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या, तसेच आज होळी सणामुळे व्यवहारांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे २२ वा हप्ता आज होळीला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
दरवर्षी ६,००० रुपयांची थेट मदत
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. देशभरातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असल्याचा अंदाज आहे. शेतीसाठी बियाणे, खते, औषधे किंवा इतर किरकोळ खर्च भागवण्यासाठी ही मदत उपयोगी ठरते.
advertisement
eKYC अनिवार्य, अन्यथा हप्ता अडू शकतो
योजनेच्या नियमांनुसार सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी eKYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्याप eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो. eKYC पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये अधिकृत पोर्टलवर OTP द्वारे ऑनलाइन पडताळणी. तसेच जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी.
advertisement
तुमचे नाव यादीत आहे का? मोबाईलवरून तपासा
हप्ता जमा होणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी शेतकरी घरबसल्या अधिकृत संकेतस्थळावर तपासणी करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ‘शेतकरी कॉर्नर’ या विभागात जा.‘लाभार्थी यादी’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर राज्य, जिल्हा, तहसील/उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.‘रिपोर्ट मिळवा’ वर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर यादी दिसेल. त्यामध्ये आपले नाव तपासा. तसेच ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायाद्वारे नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून मागील सर्व हप्त्यांची स्थितीही पाहता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 12:53 PM IST








