advertisement

Pune Crime : रात्री बेकरीत आले, केक घेतला, पैसे मागताच कोयता काढला अन्...500 रुपयांसाठी पुण्यात राडा

Last Updated:

केवळ केकचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयत्याचा धाक दाखवत या गुंडांनी दुकानदाराच्या खिशातून दोन हजार रुपये हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली.

पुण्यात केकवरून राडा (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यात केकवरून राडा (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड : शहरात कोयता गँगची दहशत थांबण्याचे नाव घेत नसून, आता पिंपळे सौदागरसारख्या उच्चभ्रू परिसरात अशीच एक घटना घडली. केवळ केकचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयत्याचा धाक दाखवत या गुंडांनी दुकानदाराच्या खिशातून दोन हजार रुपये हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (२६ फेब्रुवारी) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास जगताप नगर, पिंपळे सौदागर येथील एका बेकरीत घडली. आदित्य मानवतकर, अथर्व चव्हाण आणि यश दुर्गे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बेकरी चालक नौशाद मुख्तार अहमद (४२) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
advertisement
पैसे मागितले म्हणून काढला कोयता
आरोपी बेकरीमध्ये आले आणि त्यांनी केक घेतला. मात्र, केकचे पैसे न देताच ते दुकानातून निघून जाऊ लागले. जेव्हा नौशाद अहमद यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी संतापून त्यांच्याशी हुज्जत घातली. आरोपींनी फिर्यादीच्या शर्टाच्या खिशात हात घालून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता, टोळक्याने सोबत आणलेला कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली.
advertisement
भरवस्तीत रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पीडित दुकानदाराने शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध जबरी चोरी आणि दहशतीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : रात्री बेकरीत आले, केक घेतला, पैसे मागताच कोयता काढला अन्...500 रुपयांसाठी पुण्यात राडा
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement