Nashik Crime: रेल्वेची ओळख महागात पडली, परदेशातल्या नोकरीसाठी लाखोंचा गंडा; नेमकं काय घडलं?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
एका कुटुंबाला रेल्वे प्रवासातली ओळख चांगलीच महागात पडली आहे. नोकरीचे आमिष देऊन एका व्यक्तीकडून लाखो रूपये उकळण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक: प्रवासातली ओळख एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नोकरीचे आमिष देऊन एका व्यक्तीकडून लाखो रूपये उकळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परदेशातील नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवले होते. पंजाबच्या चोरट्याने सिडकोतल्या एका मॅनेजरला नोकरीचे आमिष दाखवून तब्बल साडे पाच लाखांचा चुना लावला आहे. नाशिकच्या अंबड पोलिसांनी संशयिताला नोटीस बजावली असून त्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे? आरोपीवर कशापद्धतीने कारवाई सुरू आहे? जाणून घेऊया...
रेल्वे प्रवासादरम्यान एका महिलेला अनोळखी प्रवाशासोबत ओळख करणं चांगलंच महागात पडले आहे. सासूबाईंनी ज्या व्यक्तीसोबत विश्वासाने ओळख केली, त्याच व्यक्तीने त्या महिलेच्या निधनानंतर त्यांच्या जावयाला लाखोंचा गंडा घातला आहे. एका प्रवासादरम्यान मुळचे पंजाबचे मनोज धरमसिंग नांगला हे नाशिकच्या सिडको परिसरामध्ये राहतात. ते एका नाशिकच्या एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. मनोज यांच्या सासूबाईंची आणि पंजाबच्या जालंधरमध्ये राहणाऱ्या जतिंदरसिंग परमजितसिंग या संशयितासोबत ओळख झाली. 2023 साली मनोज यांच्या सासूबाई पंजाब ते मनमाड असा प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान त्यांची या महाठगासोबत ओळख झाली. तेव्हा त्यांनी त्यांचा नंबर घेऊन आमच्या जावयाचंही काही भलं करा असं त्याला सांगितला.
advertisement
जतिंदर सिंगने मनोज यांच्या सासूबाईंचा विश्वास संपादन करत, "मी भारतीय तरूणांना ऑस्ट्रेलियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो", असं सांगितलं. तेव्हा त्यांनी जतिंदरला माझ्या जावयालाही ऑस्ट्रेलियामध्ये जॉबला लावा, त्याचंही भलं कर, असं त्यांनी त्याला सांगितलं. आपल्या कामासाठी मनोज यांच्या सासूबाईंनी जतिंदरचा नंबरही सेव्ह करून ठेवला होता. पण हाच विश्वास संपादन केलेल्या माणसाने त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वासघात केला आहे. अचानक एक दिवशी, जतिंदर नाशिकमध्ये आला आणि त्याने मनोजचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मनोजचा विश्वास संपादन करण्यासाठी त्या व्यक्तीने मनोजच्या पासपोर्टची प्रक्रियाही सुरू केली होती. 17 जून 2024 रोजी जतिंदरने डायरेक्ट मनोजच्या व्हॉट्स ॲपला ऑस्ट्रेलियाचा व्हिझा आणि प्राईम फ्लोअर मिल्स नावाच्या कंपनीचे ऑफर लेटर सुद्धा पाठवले.
advertisement
जतिंदरने मोहनला ही सर्व माहिती पाठवल्यानंतर त्याचा विश्वास बसला. जतिंदरने इतकंच नाही तर, ऑस्ट्रेलियन सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच बनावट शिक्के मारलेले कागदपत्रे सुद्धा पाठवले होते. इतके सर्व कागदपत्र पाठवल्यानंतर त्याचा विश्वास बसला. त्याला खात्री पटली. या सर्व डॉक्यूमेंट्सच्या पैशासाठी आणि इतरत्र काही खर्चासाठी त्या व्यक्तीने मनोज यांच्याकडून गुगल पे, आरटीजीएस किंवा रोख रक्कम या स्वरूपातूनच पैसे घेतले आहे. जतिंदरने मनोजकडून तब्बल 5 लाख 43 लाख रूपये लाटले आहेत. त्याच दरम्यान मनोज यांच्या सासुबाईंचं निधन झालं होतं. इतके दिवस होऊनही नोकरीचा काही ठावठिकाणा नसल्यामुळे मनोज यांनी जतिंदर विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या व्यक्तीनेही मनोज यांना दिलेले सर्व कागदपत्रे सुद्धा खोटे होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी यांच्याकडून हा तपास केला जात आहे.
advertisement
अंबड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित आरोपी जतिंदरला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पुढच्या 14 दिवसांमध्ये तो हजर न झाल्यास त्याला थेट पंजाबमधूनच अटक केली जाणार आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 3:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime: रेल्वेची ओळख महागात पडली, परदेशातल्या नोकरीसाठी लाखोंचा गंडा; नेमकं काय घडलं?







