advertisement

महिलांचं 'हार्ट ब्रेक' होण्याचं प्रमाण वाढलं! हृदयरोग वाढण्याचं धक्कादायक कारण आलं समोर...

Last Updated:
increasing heart attack risk in women : हार्ट अटॅक हा कोणालाही होऊ शकतो. हल्ली त्याचं प्रमाण वाढतंय. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. यापैकी आत्तापर्यंत पुरुषांना हार्ट अटॅकची भीती जास्त असायची. मात्र हल्ली महिलांमध्ये याचं प्रमाण वाढत आहे. ही माहिती स्वतः डॉक्टरांनीच दिली आहे. पण महिलांमध्ये हार्ट अटॅकची नेमकी कारणं काय? चला जाणून घेऊया.
1/9
मेडिकल लिटरेचरनुसार, हृदयरोगाचा परिणाम प्रामुख्याने पुरुषांवर जास्त होतो. त्या तुलनेत महिलांना कमी होतो. कारण इस्ट्रोजेनच्या उपस्थितीमुळे काही प्रमाणात महिलांच्या हृदयावर नैसर्गिक जैविक कवच म्हणजेच नॅच्युरल शिल्ड असते. मात्र अलीकडेच आलेल्या एका माहितीनुसार, महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. पाहुयात त्याची कारणं.

2/9
TOI ने नागरी-संचालित 'सायन रुग्णालया'च्या हवाल्याने सांगितले आहे की, सायन रुग्णालयाच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार, महिलांमधील नैसर्गिक जैविक कवच कमी होत चालले आहे. रुग्णालयात महिलांमध्ये हृदयरोगाच्या प्रक्रियेत दोन वर्षांत जवळजवळ 20% वाढ झाली.

3/9
यामध्ये 20-40 वयोगटातील महिलांवरही हृदयरोगाच्या प्रक्रिया केल्या गेल्या. सर्वात सामान्यपणे प्रभावित वयोगट 50-60 होता. शिवाय हृदयविकाराच्या घटनांमध्ये केली जाणारी कोरोनरी अँजिओप्लास्टी, महिलांमध्ये केल्या जाणाऱ्या सर्व हृदयरोगाच्या प्रक्रियेपैकी 20% होती. मधुमेह, तंबाखू आणि उच्च रक्तदाब हे प्राथमिक जोखीम घटक आहेत.

4/9
सायन रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रताप नाथानी यांनी सांगितले की, अधिक चिंताजनक बाब म्हणजे, बहुतांश महिलांना विविध ओपीडी आणि विभागांद्वारे त्यांच्याकडे रेफर केले जाते. मात्र महिलांना काहीतरी त्रास होत आहे, त्यांना हृदयविकाराची शंका आली आणि त्या स्वतःच डॉक्टरांकडे आल्या, असे कधीच घडत नाही.

5/9
याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पूर्वीपासून आणि आताही महिला त्यांच्या रोग्याकडे दुर्लक्ष करतातच. त्याव्यतिरिक्त महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे फार स्पष्ट किंवा पुरुषांसारखी दिसत नाहीत. म्हणून बऱ्याच रुग्णांना हॉस्पिटमध्ये येईपर्यंत उशी होतो आणि जे ज्यांना वाचवू शकतो, त्यांचे नशिब बलवत्तर असते.

6/9
डॉ. प्रताप यांनी देखील सांगितले की, महिलांमधील हृदयरोगाची लक्षणं लवकर कळत नाही. कारण त्यांना आधीच आम्लता किंवा थकवा, पाठदुखी, पोटदुखी, जबडा किंवा मानदुखी, मळमळ, फ्लूसारखी लक्षणे आणि अगदी चिंता यासारखे असामान्य त्रास होत असतात. यांना मग विविध आजार समजले जाऊ शकते.

7/9
त्यांनी एका रुग्णाचे उदाहरण देखील दिले. डॉ विद्या सुरतकाळ या गेल्या चार वर्षांपासून लीलावती रुग्णालयात एका महिलेवर उपचार करत आहेत. ही 28 वर्षीय महिला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या घेऊन रुग्णालयात आली होती. मात्र अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज आढळल्यानंतर अँजिओप्लास्टी करून बाहेर पडली. ती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या धमन्यांच्या त्रासासह अनेक वेळा परत आली. आता तिचे बायपास देखील झाले आहे. मात्र तिच्या बाबतीत कोणतेही स्पष्ट घटक किंवा कारण समजत नाही.

8/9
सायन रुग्णालयातील डॉक्टरांना 16% प्रकरणांमध्ये, ताणतणाव हा एक घटक असल्याचे आढळले. मात्र दरवर्षी 1% प्रकरणांमध्ये कारण अज्ञात आहे. डॉ. नथानी आणि डॉ. सुरतकल दोघांनीही सांगितले की, प्रदूषणासारख्या घटकांचा हृदयरोगांशी संबंध आहे. पण स्पष्ट आणि ठामपणे सांगण्यासाठी अधिक डेटा आवश्यक आहे. डॉ. नथानी म्हणाले की, महिला त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या असलेल्या इस्ट्रोजेनमुळे संरक्षित आहेत. परंतु शहरी जीवन, ताणतणाव, झोपेचा अभाव आणि महिलांमध्ये धूम्रपानाचे वाढते प्रमाण.. या सर्व गोष्टी त्या संरक्षणात्मक थराला फाडून टाकत आहे.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement