Shimgotsav: कोकणात शिमग्याला येवढं काय-काय करतात? संकासुराची हवा, पालख्यांचा नाच म्हणजे सळसळता उत्साह
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shimga 2026: कोकणातल्या शिमग्याचं मुख्य आकर्षण म्हणजे देवाची पालखी. प्रत्येक गावाची ग्रामदेवता या दिवसांत आपल्या मंदिरातून बाहेर पडते आणि भक्तांना भेटायला घरोघरी जाते.
मुंबई : कोकणातील शिमगा म्हणजे नुसता सण नाही तर तो एक मोठा लोकोत्सव असतो असं म्हणता येईल. मुंबईत असलेला चाकरमानी सुद्धा या दिवसांत ओढीनं आपल्या गावी जातो. कोकणातल्या शिमग्याचं वातावरण, संकासुराचा खेळ आणि पालख्यांचा नाच हे सगळं अनुभवणं म्हणजे एक पर्वणीच असते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहून मन प्रसन्न होते. कोकणातील शिमग्याच्या सणाची थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
संकासुराची एन्ट्री आणि हवा - शिमगा सुरू झाला की सगळ्यात आधी चर्चा होते ती संकासुराची. काळाकुट्ट रंग, अंगावर फाटकी तुटकी कपडे, तोंडावर एक विशिष्ट मुखवटा आणि हातात काठी, अशा रूपात संकासूर घरोघरी फिरतो. ढोल-ताशांच्या तालावर संकासूर जो नाच करतो, त्याला एक वेगळीच लय असते. लहान मुलं त्याला पाहून थोडी घाबरतात तर मोठी माणसं त्याची थट्टा-मस्करी करतात. संकासूर हा लोकांच्या करमणुकीसाठी आणि उत्सवाचा निरोप देण्यासाठी येतो असं मानलं जातं.
advertisement
पालखीचा नाच आणि ग्रामदेवतेची भेट - कोकणातल्या शिमग्याचं मुख्य आकर्षण म्हणजे देवाची पालखी. प्रत्येक गावाची ग्रामदेवता या दिवसांत आपल्या मंदिरातून बाहेर पडते आणि भक्तांना भेटायला घरोघरी जाते. जेव्हा पालखी घराच्या अंगणात येते, तेव्हा घराची माणसं देवाची पूजा करतात आणि नैवेद्य दाखवतात. पालखी उचलणारे खांदकरी जेव्हा ढोल-ताशांच्या जोरावर पालखी नाचवतात, तेव्हा बघणाऱ्याचं भान हरपतं. पालखीच्या नाचात एक वेगळीच शक्ती असते, जी पाहायला खूप भारी वाटते.
advertisement
नमन आणि खेळे - कोकणात रात्रीच्या वेळी नमन किंवा खेळे यांसारखे लोककला प्रकार सादर केले जातात. यामध्ये पौराणिक कथांवर आधारित नाटके, गाणी आणि डान्स असतो. ही रात्रभर चालणारी करमणूक गावातील लोकांना एकत्र आणते. यातली गाणी आणि लोकसंगीत ऐकताना डोळ्यांचं पारणं फिटतं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 12:37 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shimgotsav: कोकणात शिमग्याला येवढं काय-काय करतात? संकासुराची हवा, पालख्यांचा नाच म्हणजे सळसळता उत्साह








