advertisement

'देवखेळ'नंतर आता 'तुंबाडची मंजुळा'! कोकणातील आणखी एक गूढ रहस्यकथा, PHOTO

Last Updated:

काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.

News18
News18
मागच्या काही वर्षात कोकणात शूट केलेले, कोकणातील संस्कृती दाखवणारे, कोकणची कथा असलेले काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. 2025 मध्ये आलेला दशावतार या सिनेमात कोकणातील 'दशावतार' दाखवण्यात आला होता. तसंच 'एप्रिल मे 99', 'कुर्ला टू वेंगुर्ला', 'नारबाची वाडी', 'काकस्पर्श' अलिकडे आलेल्या 'देवखेळ' या वेब सीरिजमधून कोकण प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा कोकणात पाहायला मिळतो. त्याचबरोबर याचभोवतीने फिरणाऱ्या किती तरी गूढ अशा रहस्यमय कथा आणि सोबतीला गावाकडच्या गजाली. भुता - खेतांवरील चर्चा हा गावाकडच्या माणसांचा कायमच मनोरंजनाचा विषय राहिलेला आहे. यातच वीतभर घडलेल्या गोष्टी हातभर लांब करून सांगणे हा जणू अनेकांचा आवडता छंदच. अशाच काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'तुंबाडची मंजुळा' असे या चित्रपटाचं नाव असून होळीच्या दिवशी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं आगळं वेगळं मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा एक गूढ चेहरा आणि दोन्ही कवाडांच्यामध्ये अडकलेले काही हात.. जणू काय घरातून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत हे सांगणारं हे पोस्टर अतिशय औत्सुक्यपूर्ण झालेलं आहे. पहिल्या पोस्टरपासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेला तुंबाडची मंजुळाची चर्चा रंगली आहे.
advertisement
या चित्रपटात कोण कोण कलाकार असतील ? याची नेमकी गोष्ट काय असेल ? आणि तुंबाडची ही मंजुळा कोण असेल ? या गोष्टी मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमातून
advertisement
विविध कोरगावकर या नव्या दमाचा दिग्दर्शक दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे आहे. झी स्टुडिओजच्यावतीने उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी प्रेक्षक हा एकाच वेळी जेवढा आधुनिक विचारसरणीचा असतो तेवढाच तो आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी जोडलेला असतो. यामुळेच आजच्या काळातही आपल्या गावच्या मातीची, तेथील परंपरेची गोष्ट सांगणारा विषय त्याला कायमच भावतो. मागील वर्षी आम्ही आणलेला ‘दशावतार’ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण. ‘तुंबाडची मंजुळा’ हा देखील असाच गावाकडचा एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे, असं झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवेलकर यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'देवखेळ'नंतर आता 'तुंबाडची मंजुळा'! कोकणातील आणखी एक गूढ रहस्यकथा, PHOTO
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement