शर्मा जी स्वतः ताज्या फळांपासून, बासुंदी आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून रोज ताजी कुल्फी बनवतात. त्यांच्या हातची कुल्फी चवीला तर अप्रतिम असतेच पण गुणवत्तेतही उत्तम असते. स्ट्रॉबेरी, मावा, पिस्ता, बदाम, केशर, आंबा, चॉकलेट अशा विविध फ्लेवरमध्ये ही कुल्फी उपलब्ध असते. फक्त 50 रुपयांत 100 ग्रॅम कुल्फी मिळते, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनाही ही कुल्फी परवडते. सायंकाळ होताच मुंबई सेंट्रल स्टेशन परिसरातील नवजीवन सोसायटीसमोर असलेल्या या छोट्याशा स्टॉलवर गर्दी उसळते.
advertisement
ऑफिसहून परतणारे कर्मचारी, कॉलेजचे विद्यार्थी, पर्यटक सगळेचजण कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी थांबतात. अनेक लोक तर खास या कुल्फीच्या प्रेमामुळे लांबून लांबून येतात. शर्मा जी हसत सांगतात “आमचं काम फक्त कुल्फी विकण्याचं नाही तर लोकांच्या चेहऱ्यावर स्वादिष्ट चवीचं समाधान आणण्याचं आहे. आम्ही रोज ताजी कुल्फी बनवतो कारण आमच्यासाठी चव आणि गुणवत्ता हीच खरी ओळख आहे.” आजच्या डिजिटल युगात अनेक मोठे ब्रँड्स आणि आकर्षक डेझर्ट्स बाजारात आले असले तरी ‘शर्मा जी कुल्फीवाले’ अजूनही मुंबईकरांच्या मनात तितक्याच प्रेमाने आपली जागा टिकवून आहेत. त्यांच्या कुल्फीतला घरगुतीपणा, पारंपरिक पद्धत आणि प्रामाणिकपणाचा संगमच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो.