TRENDING:

Panvel News : ''रिक्षा बंद पडली'' असे खोटे सांगितले अन्...; पनवेलमध्ये भररस्त्यात महिलेचा केला घात; घडलं काय?

Last Updated:

Shocking Crime New Panvel : जर तुम्हीही रिक्षातून प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण एका महिलेला थेट रुग्णालयात जावे लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : शहरात कुठे ही बाहेर जाण्यासाठी हजारो नागरिक रिक्षाचा वापर करतात. अशाच एका महिलेने एका ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा घेतली पण यातून प्रवास करणं तिला थेट मृत्यूच्या दारात पोहचवलं आहे. घडलेला हा प्रकार नवीन पनवेलमधील असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

दागिन्यांसाठी चालकाने ओलांडल्या सर्व सीमा

मिळालेल्या माहितीनुसार,नवीन पनवेलमध्ये एका 36 वर्षीय महिलेवर चाकूने हल्ला करून तिचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

रिक्षाचालकाने रिक्षा बंद पडल्याचे नाटक

संगीता भोईर या करंजाडे आर-3 येथे राहतात. त्या सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मार्केटमधून घरी जाण्यासाठी उरण नाका येथील गणेश स्वीटजवळील रिक्षा स्टॉपवर आल्या होत्या. त्या एका रिक्षात बसून करंजाडेच्या दिशेने निघाल्या. करंजाडे आर-4 मधील सत्य ट्रायडेंट इमारतीजवळील सर्व्हिस रोडवरील नाल्याच्या पुलावर पोहोचल्यावर रिक्षाचालकाने रिक्षा बंद पडल्याचे सांगितले. तो रिक्षा ढकलतो असे सांगून खाली उतरला.

advertisement

पाठीमागून येत गळ्यावर चाकूचा वार

यानंतर त्याने अचानक पाठीमागून संगीता यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. घाबरलेल्या संगीता यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी रिक्षातून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांच्या छाती आणि पायावरही वार करत गळ्यातील मंगळसूत्र, चेन, मोबाईल आणि पैशांची पर्स जबरदस्तीने हिसकावून घेतली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

यानंतर तो चिंचपाडा-करंजाडे पुलाच्या दिशेने पळून गेला. या हल्ल्यात संगीता गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी रिक्षाचालक सुमारे 3 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Panvel News : ''रिक्षा बंद पडली'' असे खोटे सांगितले अन्...; पनवेलमध्ये भररस्त्यात महिलेचा केला घात; घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल