ही सर्व गोष्ट जरी सिनेमा सारखी वाटत असली तरी खरी होती. मुंबईत सुरु झालेल्या अपहरणाच्या नाटकातून ही घटना अखेरीस व्यसनमुक्ती आणि वेलनेस ट्रीटमेंटपर्यंत पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना ही वर्सोवा येथे राहत असलेल्या एका व्यावसायिकाची असून त्याचे नाव चंद्रकांत भुनु आहे.
नेमकं घडलं तरी काय?
अपहरणाच्या रात्री घडले की, या व्यावसायिकाच्या घरी चारजण रात्री अचानक दाखल झाले आणि त्यांनी त्यांना काही उत्तर न देता जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. अपहरण केल्यानंतर त्या व्यक्तीला काहीही झालं नसून वसईतील एका शांत रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेले गेले. भुनु स्वतःही तिथे उपचार घेण्यास सहमत झाले.
advertisement
पोलिस तपासात आश्चर्याचा विषय समोर आला की, जे लोक व्यवसायिकाला अपहरण करून नेले, ते प्रत्यक्षात त्या रिहॅब सेंटरचे कर्मचारी होते. या सर्व कर्मचार्यांना भुनुच्या पहिल्या पत्नीने कामावर ठेवले होते. तिचा उद्देश फक्त भुनुच्या मदतीसाठी होता कारण त्याला दारूवर व्यसन असल्याची तक्रार तिने केली होती.
भुनुच्या दुसऱ्या पत्नी अफसाना अरब यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती की,5 ऑक्टोबरच्या रात्री चार जण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांना त्यांच्या पतीला घेऊन गेले. दुसऱ्या पत्नीच्या माहितीनुसार, भुनु आणि त्याचा पहिल्या पत्नीचा मुलगा सतत मालमत्तेवर वाद करायचे. या पार्श्वभूमीवर तिने अपहरणाची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले. शहरभर तपास सुरू ठेवला असता पोलिस पालघर येथील एका रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पोहोचली. तिथेच भुनु स्वतः उपचार घेत होते. या घटनेमुळे पोलिसांना धक्का बसला. अपहरण म्हटले गेले, पण प्रत्यक्षात तो एक कौटुंबिक उपाय होता. पहिली पत्नी भुनुच्या मदतीसाठी त्याला रिहॅब सेंटरमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तर दुसरी पत्नीला परिस्थिती समजल्यावर ती पोलिसांकडे गेलेली होती.
घटनेने मुंबईत मोठी चर्चा उडवली आहे. कौटुंबिक वाद, व्यसनमुक्ती आणि अपहरणाच्या नाटकामुळे ही घटना रोमांचक बनली आहे. पोलिस सध्या या प्रकरणातील सर्व कर्मचार्यांचा तपास करत आहेत आणि भुनुच्या सुरक्षेसाठी योग्य ती कारवाई सुरू आहे.