सोनू बराई असं हल्लेखोर आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाचौकी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचे आणि सोनू बराई याचे प्रेमसंबंध होते. मात्र, ८ ते १० दिवसांपूर्वीच दोघांमध्ये काही कारणास्तव ब्रेकअप झाला होता. हा ब्रेकअप आरोपी सोनू बराई याच्या जिव्हारी लागला होता. ब्रेकअपमुळे सोनू बराई प्रचंड रागात होता. याच रागातून त्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
शुक्रवारी सकाळी भर वस्तीत आरोपी सोनू बराई याने तरुणीला गाठले आणि तिच्यावर थेट तलवारीने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, यात तरुणी गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तातडीने तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
हा सगळा थरार घडल्यानंतर आरोपी सोनू बराई याने लगेच स्वतःला संपवलं आहे. प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस येताच काळाचौकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी सोनूचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
