रुग्णाच्या डाव्या स्तनामध्ये ४–५ सेंमी आकाराची गाठ आढळल्यानंतर तिला केमोथेरपीद्वारे उपचार देण्यात आले. पुढील जनुकीय तपासणीत BRCA जीन पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यानं शस्त्रक्रिया आवश्यक ठरली. पारंपरिक मास्टेक्टमीमुळे मोठा व्रण राहण्याचा धोका असल्याने, एंडोस्कोपिक पद्धत निवडण्यात आली. या प्रक्रियेत छातीच्या बाजूला केवळ ३–४ सेंमीचे छिद्र करून शस्त्रक्रिया केली जाते, ज्यामुळे संवेदना टिकतात आणि कॉस्मेटिक परिणाम उत्तम मिळतात.
advertisement
डॉक्टरांनी काय सांगितलं?
“स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या तरुण महिलेचे होणारे भावनिक नुकसान हे शारीरिक हानीइतकेच लक्षणीय ठरू शकते. आमचा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर ठळकपणे दिसणाऱ्या व्रणाबाबत तसेच शारीरिक स्व-प्रतिमेबद्दल प्रचंड चिंतित होता. मूल्यमापनानंतर आम्ही एंडोस्कोपिक स्किन-अँड निपल स्पेअरिंग मास्टेक्टमीचा सल्ला दिला. या प्रगत, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जिकल प्रक्रियेमध्ये कर्करोगाशी संबंधित सुरक्षितता आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने साधलेली एकसंधता या दोहोंची खबरदारी घेतली जाते, ज्यामुळे रुग्णांना त्यांचा आत्मविश्वास, स्व-प्रतिमा आणि जीवनमानाचा दर्जा पुन:प्रस्थापित होतो. ही गोष्ट किती परिवर्तनकारी ठरू शकते याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. येथे, जसलोक हॉस्पिटलमध्ये या प्रक्रियेला मिळालेले यश हे केवळ शस्त्रक्रियात्मक नवसंकल्पनांचे नाही तर आमच्या संपूर्ण टीमने दिलेल्या भक्कम आधाराचे आणि त्यांच्यातील समन्वयाचे द्योतक आहे. या संपूर्ण वाटचालीत माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी डॉ. सदाशिव चौधरी, नर्सिंग टीम आणि जसलोक हॉस्पिटलच्या संपूर्ण कर्मचारीवर्ग यांच्याप्रती विशेषत्वाने कृतज्ञ आहे.” असं जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे ऑन्कोप्लासटिक आणि रोबोटिक ब्रेस्ट सर्जन डॉ. संदीप एम. बिप्ते यांनी सांगितलं.
रुग्णाला एका दिवसाच डिस्चार्ज
ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागूंतीविना पूर्ण करण्यात आली, परिणामी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अगदी कमी अस्वस्थाता वाटली आणि तिची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत झाली. रुग्णाल शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका दिवसात घरी पोहोचविण्यात आलं. “हा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे जसलोक हॉस्पिटलसाठीचा एक अभिमानाचा क्षण आहे. पश्चिम भारतातील पहिली व्रणरहित एंडोस्कोपिक मास्टेक्टमी व त्यासोबत तत्काळ रिकन्स्ट्रक्शनची शस्त्रक्रिया पार पाडण्यातून नवसंकल्पना आणि रुग्ण-केंद्रित देखभालीप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. तरुण रुग्णाची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत झाली आहे, यातून या प्रक्रियेची सुरक्षितात, अचूकता आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळण्याचे आश्वासन ठळकपणे दिसते.” असं चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके यांनी सांगितलं.
“ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी केवळ उपचार नव्हता, तर नव्या आत्मविश्वासाची सुरुवात होती. आज आरशात स्वतःकडे पाहताना मला संपूर्ण व्यक्ती असल्याचा अभिमान वाटतो.” अशी प्रतिक्रिया रुग्णाने दिली.