TRENDING:

Suzuki Burgman ने वळणावर दिला दगा, डोळ्यादेखत 2 मित्रांचा करुण अंत, मुंब्य्रातील घटनेचा CCTV VIDEO

Last Updated:

वळणावर शाळेच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला पण अचानक स्कुटी रस्त्यावर घसरली. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्य्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा येथील एमएम व्हॅलीत भरधाव बसने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली.  धडक दिल्यानंतर बसने दुचाकीस्वारांना चिरडत नेलं. या अपघातात २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंब्रा येथील एमएम व्हॅली परिसरात दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश दवंडे (वय 20) आणि संगम फुलशेरे (वय 17) अशी मृतांची नावं आहे. हे दोघेही ठाकूरपाडा  मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्यांच्यासोबत तिसरा युवक महेश वारे (वय 18) हा गंभीर जखमी असून, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे

advertisement

ओव्हरटेक जिवावर बेतला

अविनाश दवंडे,  संगम फुलशेरे आणि महेश वारे हे तिघेही तरुण स्कुटीवरून एमएम व्हॅली परिसरातून जात होते. वळणावर शाळेच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला पण अचानक स्कुटी रस्त्यावर घसरली.  तोल गेल्यामुळे स्कुटीवरील तिघेही खाली कोसळले आणि नेमकं त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बसच्या चाकाखाली सापडले.  यामध्ये पुढील आणि मागील चाकाखाली आल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video
सर्व पहा

जखमी महेश वारेला सध्या मुंब्रा येथील हकीम हजमल खान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, दुचाकीस्वार वेगात बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अचानक गाडीचा तोल गेल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Suzuki Burgman ने वळणावर दिला दगा, डोळ्यादेखत 2 मित्रांचा करुण अंत, मुंब्य्रातील घटनेचा CCTV VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल