नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्डची डिलेव्हरी सर्व्हिस बंद राहणार आहे. नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येलाच या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात या संपाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. जे नागरिक कोणतीही ऑनलाईन वस्तू किंवा जेवण ऑर्डर करणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन डिलेव्हरीसाठी अडचण येण्याची शक्यता आहे. या बंदचा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, नागपूरसह देशभरातली अनेक प्रमुख शहरांना या बंदचा मोठा फटका बसणार आहे.
advertisement
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ट ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. मुख्य ऑनलाईन डिलेव्हरी ॲपसोबतच महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील काही प्रादेशिक संघटनांनीही या संपामध्ये आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या संघटनांकडूनही ग्राहकांना सर्व्हिस दिली जाणार आहे. देशातील तब्बल एक लाखांहून अधिक डिलेव्हरी बॉय आज त्यांच्या ॲपचं लॉग ईन करणार नसून काही मर्यादित काळासाठीच ग्राहकांना सर्व्हिस पुरवणार आहेत. परिणामी आज प्रत्येक डिलेव्हरी सर्व्हिसचा नागरिकांना फटका बसणार आहे.
डिलेव्हरी ॲप सर्व्हिस न देण्याचं कारण काय?
देशभरातल्या सर्वच ऑनलाईन डिलेव्हरी सर्व्हिस ॲपने यापूर्वी 25 डिसेंबरला संप केला होता. सर्व गिग कामगारांच्या वाढत्या मागण्या असूनही त्यांच्या कामाची सवय अजूनही बदललेली नाही. कंपन्या त्यांना पुरेसे पैसे सुद्धा देत नाहीत किंवा सुरक्षिततेची हमी देत नाहीत, असं गिग कामगारांच्या युनियनचं म्हणणं आहे. डिलेव्हरी बॉईजकडून वाईट परिस्थितीचा वाईट परिस्थितींचा निषेख करण्यासाठी संपची हाक देण्यात आली आहे. ऊन, थंडी, पावसाळा या तिन्ही ऋतुंमध्ये, डिलेव्हरी बॉईजकडून ग्राहकांना सुविधा पुरवली जाते. त्यांना कायमच अपघातांचा धोका सर्वाधिक असतो. ग्राहकांना वेळेमध्ये वस्तू पोहोचवूनही त्यांना कंपन्यांकडून कोणताही विमा आणि पेन्शनचे फायदेही पुरवले जात नाहीत.
