TRENDING:

धावत्या ट्रेनमध्ये प्रसूती वेदना, नशीबाने गाडी थांबली, पण डॉक्टरच नव्हता,शेवटी कशी पार पडली डिलिव्हरी?

Last Updated:

एका महिलेला धावत्या ट्रेनमध्ये प्रसुती वेदना जाणवत होत्या.पण ट्रेन सुपरफास्ट असल्याने थांबेल की नाही याची भिती होती. पण त्यात नशिबाने ट्रेन कसाऱ्याला थांबली पण डॉक्टरच उपलब्ध नव्हते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Thane News : ठाण्यातून माणुसकीच दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेला धावत्या ट्रेनमध्ये प्रसुती वेदना जाणवत होत्या.पण ट्रेन सुपरफास्ट असल्याने थांबेल की नाही याची भिती होती. पण त्यात नशिबाने ट्रेन कसाऱ्याला थांबली पण डॉक्टरच उपलब्ध नव्हते.शेवटी नागरीकांनी पुढाकार घेतला आणि देवदूत बनून आलेल्या सिस्टरमुळे ही प्रसुती यशस्वीरित्या पार पडली होती
News18
News18
advertisement

खरं तर नगेंद्र कुमार यांची पत्नी ममता कुमारी या रेल्वेने बिहारला जात होत्या. पण रेल्वे प्रवासादरम्यान अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. रेल्वेमध्ये डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली होती.मुंबईहून पुढे जाणारी एक्सप्रेस कसारा स्थानकावर इंजिन जोडण्यासाठी थांबणार होती. त्या वेळेत कसारा पर्यंत कसेबसे पोहोचू दे, अशी प्रार्थना करत हे दांपत्य देवाकडे साकडे घालत होते. आणि देवाने त्यांच ऐकलं आणि गाडी थांबली.

advertisement

दरम्यान ट्रेन कसारा स्थानकात पोहोचताच काही सज्जन नागरिकांनी तत्परतेने पुढाकार घेतला. काळूबाई चंद्रकांत लहाने आणि सरला खंडू भानगीर यांनी तातडीने धाडस दाखवत प्रसूतीसाठी मदत केली. याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कासार येथील सुकला मॅडम यांनी कर्तव्यदक्ष नर्स सिस्टर सोनाली सागर सांगळे यांना या घटनेची माहिती दिली आणि तत्काळ पोहोचण्यास सांगितलं.

advertisement

या घटनेची माहिती मिळताच सोनालीताई तात्काळ कसारा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवर कोणतेही वैद्यकीय साहित्य उपलब्ध नसताना देखील त्यांनी अत्यंत धैर्य आणि कौशल्याने प्रसूतीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहिले.

यानंतर ॲम्ब्युलन्स चालक सतीश खरे, शोभा सोनवणे, जी.आर.पी.एफ. पोलिस शिपाई विष्णू आसाराम सुपेकर, तसेच सरपंच प्रकाश वीर यांनी तातडीने मदत करत महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कासार येथे सुरक्षित पोहोचवून दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
सर्व पहा

या संपूर्ण मोहिमेत ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर रोहितजी उबाळे आणि RPF वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन मोरे यांनीही अत्यंत दक्षतेने आपले कर्तव्य पार पाडत माणुसकीचा धर्म जपला.कसारा रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना माणुसकीच दर्शन घडवते.

मराठी बातम्या/मुंबई/
धावत्या ट्रेनमध्ये प्रसूती वेदना, नशीबाने गाडी थांबली, पण डॉक्टरच नव्हता,शेवटी कशी पार पडली डिलिव्हरी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल