मिळालेल्या माहितीनुसार, ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंडीतून दुचाकीवरून तीन तरुण प्रवास करत होते. यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात जड वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनी या घटनेची माहिती तात्काळ महामार्ग पोलिसांना दिली.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
advertisement
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मनोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटली नसून सध्या त्यांच्याकडील कागदपत्रे आणि दुचाकीच्या क्रमांकावरून पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
फरार चालकाचा शोध सुरू
अपघात करून पळून गेलेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी मनोर पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. वाघोबा खिंड परिसर हा अपघातांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानला जातो, त्यातच अज्ञात वाहनांच्या वेगामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. पालघरच्या वऱ्हई येथे तीन वाहन एकमेकांना धडकली . राष्ट्रीय महामार्गावरच स्पीड ब्रेकर टाकल्याने अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर टाकता येत नसताना देखील नियम डावलून ठेकेदाराकडून स्पीड ब्रेकर बसवले आहेत नदीवरील पुलाच काम सुरू करण्यासाठी स्पीडब्रेकर टाकल्याचा ठेकेदाराने दावा केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्गाकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून शुक्रवारी संध्याकाळपासून याच ठिकाणी चार ते पाच अपघात झाल्याची स्थानिकांची माहिती आहे.
हे ही वाचा :
