TRENDING:

Mumbai : गेमचेंजर निर्णय! परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता स्वदेशातच पूर्ण, कसा होणार फायदा?

Last Updated:

UK university campuses in India : भारतातील विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज संपणार आहे. त्यासाठी मुंबईत सरकारने मोठा प्लॅन आखला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईसह देशभरातील लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात आणि त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज उरणार नाही.
News18
News18
advertisement

परदेशात जाण्याचा कोट्यवधींचा खर्च आता वाचणार

मुंबईत आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने परवानगी दिल्यानंतर इलिनॉय टेक (अमेरिका), युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ अॅबरडीन (यूके) यांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. 2026 च्या ऑगस्ट-सप्टेंबरपासून हे कॅम्पस सुरू होणार आहेत.

कुठे आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सुरू होत आहेत?

advertisement

हे विद्यापीठे प्रामुख्याने विक्रोळी आणि पवई परिसरात सुरू होत आहेत. पुढील काही वर्षांत नवी मुंबईतील प्रस्तावित एज्यु सिटीमध्ये स्थलांतर करण्याची त्यांची योजना आहे. इलिनॉय टेकचा कॅम्पस विक्रोळीत 90 हजार चौरस फूट जागेत उभारला जात आहे. यॉर्क विद्यापीठाने पवईत सुमारे 38 हजार चौरस फूट जागा घेतली आहे.

विद्यापीठांमध्ये कोणते अभ्यासक्रम उपलब्ध असतील?

advertisement

या विद्यापीठांमध्ये संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता , अर्थशास्त्र, फायनान्स, सायबर सुरक्षा आणि बिझनेस मॅनेजमेंट यांसारखे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. पदवी अभ्यासक्रमासाठी वार्षिक फी सुमारे 12 ते 18 लाख रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 20 लाख रुपयांपर्यंत फी असू शकते.

प्रवेश प्रक्रिया कोणत्या निकषांवर आधारित असेल?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Valentines Day ला खिशाला कात्री, गुलाबाला सोन्याचं मोल, किती मोजावे लागणार? Vide
सर्व पहा

प्रवेशासाठी बारावीमध्ये किमान 75% गुण आवश्यक असतील. काही अभ्यासक्रमांसाठी गणित आणि इंग्रजी विषय आवश्यक असतील. प्रवेश प्रक्रिया गुण, वैयक्तिक निबंध आणि इतर चाचण्यांवर आधारित असेल. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला 30 ते 40 जागा असतील.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : गेमचेंजर निर्णय! परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता स्वदेशातच पूर्ण, कसा होणार फायदा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल