Vasai Virar Mahanagar Palika Election 2026 : वसई विरार महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारी 2026 ला मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारी 2026 ला या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. या निवडणुकीसाठी शहरात सर्वच पक्षांनी कंबर कसायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळुहळु वातावरण तापायला सूरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी नेमकं समीकरण आणि राजाकारण कसं असणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
वसई विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाची मुदत 28 जून 2020 रोजी संपली होती. त्यानंतर कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडलेले नगरसेवक न बसताप प्रशासक शासन लागू राहिलं होतं.
सध्या वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसुचित जाती ( SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी प्रत्येकी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीत राखीव ठेवण्यात आला आहे.
मागच्या निवडणुकीचा निकाल
वसई विरार महानगरपालिका हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजा जातो. कारण गेले कित्येक वर्ष या महापालिकेवर बविआची सत्ता आहे. मागच्या 2015 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बविआने मोठी बाजी मारली होती. बविआने निवडणुकीत 115 पैकी एकट्याने 106 जिंकल्या होत्या.
वसई विरार महापालिकेचा पक्षनिहाय निकाल
बहुजन विकास आघाडी : 106
भाजपा : 1
काँग्रेस : 0
राष्ट्रवादी काँग्रेस : 0
शिवसेना : 5
इतर/अपक्ष : 3
एकूण जागा 115
सध्याच राजकारण काय म्हणतंय?
खरं तर विधानसभा निवडणुकीत वसई मतदार संघातून भाजपच्या स्नेहा दुबे आणि नालासोपारा मतदारसंघातून राजन नाईक हे दोन उमेदवार निवडून आले होते.त्यामुळे या दोन्ही नेते जिंकल्यामुळे बहुजन विकास आघाडीला त्याच्या बालेकिल्ल्यात मोठा हादरा बसला होता. आता भाजपच्या या दोन आमदाराच्या विजयाने समीकरण पूर्णत बदललं आहे. कारण बविआचे जुने सहकारी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करताय. त्यामुळे निवडणुकीआधीच बविआची ताकद हळुहळु कमी होताना दिसते आहे.
विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकारी नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी घेतल्या आहेत.या भेटीत युतीबाबत आणि जागाबाबत चर्चा सूरू आहे. पण अद्याप ठोस निर्णय झालेला नाही आहे. तर तिकडे भाजपा आणि एकनाथ शिंदे गटात युती झाली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे.
