TRENDING:

Vasai Virar Election : वसई विरारमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 91 तर शिंदेंची शिवसेना इतक्या जागा लढणार

Last Updated:

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी 2026 ला मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा 16 जानेवारीला लागणार आहे.या निवडणुकीसाठी पक्षाच्या बैठका सूरू असताना आता महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
vasai virar municiple election
vasai virar municiple election
advertisement

Vasai Virar Municiple Election : वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी 2026 ला मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा 16 जानेवारीला लागणार आहे.या निवडणुकीसाठी पक्षाच्या बैठका सूरू असताना आता महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी समोर आली आहे. या फॉर्म्युलानुसार भाजप 91 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आगरी सेना,आरपीआय आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील या जागा वाटपात सहभागी करून घेण्यात आलं आहे.

advertisement

खरं तर गुरूवारी नालासोपारा येथील भाजपा कार्यालयात झालेल्या तीन तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर या जागावाटपावर तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार भाजप 91 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आणखी 3 ते 4 जागांच्या वाटपाबाबत बोलणी सूरू आहे. त्यावरच लवकर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

advertisement

महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्यासोबत युती करण्यास इच्छुक असलेला उद्धव शिवसेना बाळासाहेब गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात अद्याप युतीची बैठक सूरू आहे. या बैठकीत नक्कीच जागा वाटपावर चर्चा झाली असेल पण अद्याप याबाबत माहिती देण्यात आली नाही आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर जागावाटपावर काय निर्णय़ घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

दरम्यान वसई विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाची मुदत 28 जून 2020 रोजी संपली होती. त्यानंतर कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडलेले नगरसेवकबसताप प्रशासक शासन लागू राहिलं होतं.

सध्या वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसुचित जाती ( SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी प्रत्येकी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीत राखीव ठेवण्यात आला आहे.

advertisement

वसई विरार महापालिकेचा 2015 चा पक्षनिहाय निकाल

बहुजन विकास आघाडी : 106

भाजपा : 1

काँग्रेस : 0

राष्ट्रवादी काँग्रेस : 0

शिवसेना : 5

इतर/अपक्ष : 3

एकूण 116 जागा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election : वसई विरारमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 91 तर शिंदेंची शिवसेना इतक्या जागा लढणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल