तथापि, दुरुस्तीपूर्वी असलेल्या वेळाप्रमाणेच दिनांक 10 एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पुढील 5 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे. शिवाय, काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा क्षेत्र नारायणनगर आणि झोन क्रमांक NX 03 सोबत संबंधित चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एनएसएस मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. मार्ग, खालाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम), हंसोटी गल्ली, खोत गल्ली, महात्मा गांधी मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंह गल्ली, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी या परिसरामध्ये दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 02.30 ते सायंकाळी 05.00 वाजता आणि रात्री 10.45 ते 11.30 वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 03.15 ते सायंकाळी 07.15 वाजेदरम्यान राहील.
advertisement
पाणीपुरवठा क्षेत्र पंतनगर आऊटलेट आणि झोन क्रमांक NX 06 सोबत संबंधित भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रांच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सी. जी. एस. वसाहत, गंगावाडी, ध्रुवराजसिंह गल्ली, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम. टी. एन. एल.) गल्लीत, ए. जी. एल. आर. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्गालगत घाटकोपर (पश्चिम) ते श्रेयस सिग्नलपर्यंतचा परिसर आदी भागात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 06.15 ते रात्री 10.30 वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 06.45 ते रात्री 11.00 वाजेदरम्यान राहील.
पाणीपुरवठा क्षेत्र सर्वोदय बुस्टींग आणि झोन क्रमांक NX 06 सोबत संबंधित सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्गालगत घाटकोपर (पश्चिम), गांधीनगर या परिसरात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 07.15 ते रात्री 09.15 वाजेदरम्यान होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 07.15 ते रात्री 09.15 वाजेदरम्यान राहील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
